"26 जानेवारी - प्रजासत्ताक दिन"-भाषण क्रमांक-१

Started by Atul Kaviraje, January 26, 2022, 01:50:33 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "26 जानेवारी - प्रजासत्ताक दिन"
                                          भाषण क्रमांक-१
                               --------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज बुधवार, दिनांक-२६ जानेवारी, २०२२ आहे. "आपला भारत १५ ऑगष्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. पण त्याची लोकशाही राज्य घटना २६ जानेवारी १९५० रोजी अमलात आली. म्हणून हा 'प्रजासत्ताक दिन' म्हणून मानला जातो. आपला  भारत हे एक मोठे लोकशाही राज्य आहे म्हणजे हे लोकांचे, लोकांनी,लोकांसाठी चालविलेले राज्य आहे." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवयित्रींनी आजच्या या ७५ व्या प्रजासत्ताक दिवसाच्या हार्दिक शभेच्छा, या सुमुहूर्तावर वाचूया, महत्त्वाची माहिती, लेख, इतिहास, भाषण, निबंध, शुभेच्छा, आणि बरंच काही.

      येणारा 26 जानेवारी साठी सर्वजण उत्सुकतेने वाट पाहत आहोत 26 जानेवारी हा आपला भारत देशासाठी खूप महत्त्वाचा आहे. प्रजासत्ताक दिवशी लहानापासून थोरांपर्यंत सर्व आनंदात असतात कारण या दिवशी आपला भारत देश प्रजासत्ताक झाला.

     26 जानेवारी दिवशी शाळा महाविद्यालय तसेच सरकारी कार्यालयांमध्ये वेगवेगळे कार्यक्रम भरविल्या जातात व या कार्यक्रमांमध्ये व्यक्ती आपल्या देशाबद्दल तसेच 26 जानेवारी या विषयावर भाषण देत असतो.

     तुम्ही देखील येणाऱ्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भाषण मध्ये सहभागी होणार असाल आणि तुम्ही या दिवसा निमित्त योग्य भाषण शोधत असाल, तर आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त भाषण घेऊन आलो. या भाषणाचा उपयोग करुन तुम्ही येणार आज 26 जानेवारी च्या भाषण समारंभामध्ये सहभागी होऊ शकता.

     आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला खरा पण 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या भारत देशामध्ये संविधान लागू झाले आणि आपला भारत देश खऱ्या अर्थाने स्वतंत्र होऊन प्रजसत्ताक झाला. तेव्हापासून आपण 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताकदिन " Republic Day " म्हणून दरवर्षी अतिशय आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतो.

     26 जानेवारी च्या निमित्ताने विविध शाळेमध्ये, महाविद्यालया मध्ये तसेच सरकारी कार्यालयांमध्ये वकृत्व स्पर्धेचे आयोजन केले जाते व या स्पर्धेमध्ये बरेच विद्यार्थी सहभागी होतात. म्हणूनच आजच्या या 26 जानेवारी भाषण मराठी । 26 January Speech in Marathi या लेखामध्ये आपण खास विद्यार्थ्यांसाठी भाषण प्रस्तुत करत आहोत.

                      26 जानेवारी भाषण ---

     मित्रांनो आज आपण 26 जानेवारी च्या निमित्ताने येथे जमलो आहोत त्यामुळे सर्वप्रथम मी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले माननीय अध्यक्ष आदरणीय व्यासपीठ, स्वतंत्र प्रजासत्ताक देशाचे सुजाण नागरिक, माझे थोर गुरुवर्य आणि येथे जमलेल्या माझे बंधू आणि भगिनींनो तुम्हा सर्वांचे आभार मानतो. तरी राज्याच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला आरंभ करतो.

     आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस. आज प्रत्येक भारतीयासाठी आनंदाचा, उत्साहचा, सन्मानाचा अणि अभिमानाचा दिवस आहे.आज आपल्या भारताचा प्रजासत्ताक दिन. म्हणजेच संविधान लागु केल्याचा दिवस. परंतु आपल्या यातील बहुतांश जणांना माहिती नसेल की, प्रजासत्ताक म्हणजे नेमके काय? " प्रजा" म्हणजे "जनता" आणि सत्ता म्हणजे "शासन".


--AUTHOR UNKNOWN
-------------------------


                         (साभार आणि सौजन्य-संदर्भ-खासमित्र.कॉम)
                       -----------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-26.01.2022-बुधवार.