"26 जानेवारी - प्रजासत्ताक दिन"-भाषण क्रमांक-5

Started by Atul Kaviraje, January 26, 2022, 02:07:04 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "26 जानेवारी - प्रजासत्ताक दिन"
                                           भाषण क्रमांक-5
                                ------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज बुधवार, दिनांक-२६ जानेवारी, २०२२ आहे. "आपला भारत १५ ऑगष्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. पण त्याची लोकशाही राज्य घटना २६ जानेवारी १९५० रोजी अमलात आली. म्हणून हा 'प्रजासत्ताक दिन' म्हणून मानला जातो. आपला  भारत हे एक मोठे लोकशाही राज्य आहे म्हणजे हे लोकांचे, लोकांनी,लोकांसाठी चालविलेले राज्य आहे." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवयित्रींनी आजच्या या ७५ व्या प्रजासत्ताक दिवसाच्या हार्दिक शभेच्छा, या सुमुहूर्तावर वाचूया, महत्त्वाची माहिती, लेख, इतिहास, भाषण, निबंध, शुभेच्छा, आणि बरंच काही.

     आपल्या भारत देशात सर्वाना शांततेत, सुखासमधानाने जागता यावे. स्वातंत्र्याचा आनंद घेत-घेत नांदता यावे. म्हणुन, संविधान निर्मितीचे महान कार्य सुरु झाले.

     आज हा प्रजIसत्ताक दिन साजरा करण्याचे मुख्य कारण म्हणजे "संविधान" होय.

     भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आम्बेडकर, डॉ. राजेंद्रप्रसाद आणि संपूर्ण मसुदा समितीच्या सदस्याची संविधान निर्मितीची जवाबदारी 2 वर्षे 11 महीने आणि 17 दिवसात पूर्ण केलि.

     26 नोव्हेंबर 1949 रोजी आधिकृतपने संविधानाचा स्वीकार करण्यात आला. व 26 जानेवारी 1950 रोजी अंमलबजावानी करण्यात आली.

     26 जानेवारी 1930 ला भारतीय कांग्रेसने पूर्ण स्वराज्याची घोषणा केलि होती. म्हणुन सव्विस जानेवारी या दिवसाची निवड संविधानाच्या अंमलबजावानी करण्यात आली.

     संविधानानुसार भारत देश सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य बनला जो न्याय, समानता, स्वातंत्र, बंधुत्व यानां चालना देत असतो. पण आज देशातील जातीय दंगली, दहशतवाद, भ्रष्टाचार, गुन्हेगारी, महिलांवरील अत्याचार वैगेरे-वैगेरे पाहिल्यास प्रश्न पडतो की,

     हाच तो क्रांतीकारकाचा स्वप्नातला भारत का? याचसाठी महापुरुषानि अथक परिश्रम घेउन आपल्याला स्वतंत्र दिले आहे का?

     नक्कीच नाही मित्रानो! प्रजासत्ताक देशाचे पावित्र आपन सर्वानी राखलेच पाहिजे. संविधानाने दिलेले अधिकार जसे आपल्याला माहिती आहे. तसेच कर्तव्य ही आपण जनून घेतले पाहिजे. व त्याचा आदर केला पाहिजे.

     चला तर देशाची समस्या माझी समस्या समजुन दूर करण्याचा प्रयत्न करुया. देशाचा प्रत्येक देशबांधव माझा बांधव आहे. असे वागून संविधानाचा सन्मान करुया. सर्वच क्षेत्रातील भ्रष्टाचाराचा नायनाट करुण लोकशाही बळकट करुया. आपल्या भारत मातेला अभिमान वाटेल असे वागुया. धन्यवाद.

     जय हिंद! जय महाराष्ट्र!


--ऋषिकेश  सोनावणे
-------------------


                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-जIनकारीबुक.कॉम)
                     --------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-26.01.2022-बुधवार.