"26 जानेवारी - प्रजासत्ताक दिन"-प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा संदेश-क्रमांक-1

Started by Atul Kaviraje, January 26, 2022, 02:49:59 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                "26 जानेवारी - प्रजासत्ताक दिन"
                             प्रजासत्ताक दिना निमित्त शुभेच्छा संदेश
                                         शुभेच्छा क्रमांक-1
                           ------------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज बुधवार, दिनांक-२६ जानेवारी, २०२२ आहे. "आपला भारत १५ ऑगष्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. पण त्याची लोकशाही राज्य घटना २६ जानेवारी १९५० रोजी अमलात आली. म्हणून हा 'प्रजासत्ताक दिन' म्हणून मानला जातो. आपला  भारत हे एक मोठे लोकशाही राज्य आहे म्हणजे हे लोकांचे, लोकांनी,लोकांसाठी चालविलेले राज्य आहे." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवयित्रींनी आजच्या या ७५ व्या प्रजासत्ताक दिवसाच्या हार्दिक शभेच्छा, या सुमुहूर्तावर वाचूया, महत्त्वाची माहिती, लेख, इतिहास, भाषण, निबंध, शुभेच्छा, आणि बरंच काही.

     "उत्सव तीन रंगांचा, आकाशी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांसाठी, ज्यांनी माझा भारत देश घडविला... भारत देशाला मानाचा मुजरा!" "स्वातंत्र्यवीरांना करुया, शतशः प्रणाम, त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान..! प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!"

            २६ जानेवारी प्रजासत्ताक दिना निमित्त शुभेच्छा संदेश---

     नमस्कार मित्रांनो. आज २६ जानेवारी. आजच्या दिवसाचे अनन्य साधारण महत्व आपल्या पैकी सर्वांना माहितीच आहे. २६ जानेवारी १९५० रोजी राज्यघटना लागू करण्यात आली होती. तेव्हा पासून संपूर्ण देशभर २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करण्यात येते. आजचा हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी खास आहे या दिवशी आपण आपल्या प्रियजनांना, नातेवाईकांना मित्र मैत्रीणीना शुभेच्छा संदेश पाठवत असतो आज आम्ही इथे काही शुभेच्छा संदेश देत आहोते ते तुम्ही फेसबुक, व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम वर शेअर करु शकता.

"भारत देश विविध रंगांचा, विविध ढगांचा आणि विविधता जपणार्‍या एकत्मतेचा..... --प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा"

"तिरंगी आमचा भारतीय झेंडा त्याला उंच उंच फडकवू, प्राणपणाने लढून आम्ही शान याची वाढवू, भारतमातेला वंदन करूया, देशाला जगातील सर्व, संपन्न राष्ट्र बनविण्यासाठी, कटिबध्द होऊया.."
--प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

--"प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा, जय हिंद!"

--"स्वत:साठी स्वप्न सगळेच बघतात, देशासाठी आपण आज एक स्वप्न बघूया, चला आपण आपला भारत सुरक्षित, सुविकसित बनवूया."
--प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

     या दिवशी राजधानी दिल्ली येथे मा. पंतप्रधान ध्वजारोहण करतात. त्यानंतर राजपथावर विविध कार्यक्रमांना सुरुवात होते. यामध्ये प्रत्येक राज्य विविध झांकी तयार करून दाखवितात. भारतीय सैन्य आपले चित्तथरारक प्रदर्शन सादर करतात. भारतीय वायूदल मार्फत आकाशात विमाने उडविण्यात येतात. याशिवाय याच दिवशी भारतातील नागरी सम्मान म्हणजेच पद्म पुरस्कारांची घोषणा सुद्धा करण्यात येते.

     फक्त राजपथावरच नव्हे तर देशाच्या प्रत्येक कान्या कोपऱ्यात प्रजासत्ताक दिन अतिशय हर्षोल्लासात साजरा केला जातो. सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सकाळी ध्वजारोहणाचा कार्यक्रम साजरा केला जातो. शाळेत तर खूपच आनंदाचे वातावरण असते. विद्यार्थ्यांची भाषणे, रंगारंग कार्यक्रम, नृत्य, समुहगीत गायन आणि सर्वात शेवटी म्हणजे गोड पदार्थांचे वितरण. अगदी सर्वांनी हा अनुभव घेतलाच असेल.

"उत्सव तीन रंगांचा, आकाशी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांसाठी, ज्यांनी माझा भारत देश घडविला...भारत देशाला मानाचा मुजरा!"

"स्वातंत्र्यवीरांना करुया, शतशः प्रणाम, त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान..! --प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !"

"गर्वाने बोला भारतीय आहे मी...."
--प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा !

भारत हा जगातील सर्वात मोठा प्रजासत्ताक देश आहे. भारत घडविण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या संसाराची राखरांगोळी केली तेव्हा कुठे प्रजासत्ताकाचे हे स्वप्न साकार झाले. आजच्या या पावन दिनी अशा सर्व देशभक्तांना शतशः नमन.

--"भारतीय प्रजासत्ताक दिन चिरायू होवो!"

"बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो."
--समस्त देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

"रूप, रंग, वेश, भाषा जरी आहेत अनेक, तरी सारे भारतीय आहेत एक"
--प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!


                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-माझीमराठी.कॉम)
                    -------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-26.01.2022-बुधवार.