"26 जानेवारी - प्रजासत्ताक दिन"-हार्दिक शुभेच्छा-शुभेच्छा क्रमांक-3

Started by Atul Kaviraje, January 26, 2022, 02:54:33 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "26 जानेवारी - प्रजासत्ताक दिन"
                                             हार्दिक शुभेच्छा
                                           शुभेच्छा  क्रमांक-3
                                 ---------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज बुधवार, दिनांक-२६ जानेवारी, २०२२ आहे. "आपला भारत १५ ऑगष्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. पण त्याची लोकशाही राज्य घटना २६ जानेवारी १९५० रोजी अमलात आली. म्हणून हा 'प्रजासत्ताक दिन' म्हणून मानला जातो. आपला  भारत हे एक मोठे लोकशाही राज्य आहे म्हणजे हे लोकांचे, लोकांनी,लोकांसाठी चालविलेले राज्य आहे." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवयित्रींनी आजच्या या ७५ व्या प्रजासत्ताक दिवसाच्या हार्दिक शभेच्छा, या सुमुहूर्तावर वाचूया, महत्त्वाची माहिती, लेख, इतिहास, भाषण, निबंध, शुभेच्छा, आणि बरंच काही.

🙂 29 राज्यांतील, 1618 भाषा, 6400 जाती,
6 धर्म, 6 पारंपारीक गट,
29 मोठे उत्सव 1 देश!
भारतीय अभिमान व्हा! ...
ग्रेट प्रजासत्ताक ...
--प्रजासत्ताक दिवस सर्वांना हार्दिक शुभेच्छा. 🙂

🙂 कर्तव्यदक्ष भूमी सीतारघुत्तमाची
रामायणे घडावी, येथे पराक्रमाची
शीर उंच उंच व्हावे, हिमवंत पर्वताचे
आ चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे 🙂

🙂 या भारतमातेला
कोटी कोटी वंदन करूया
भारताला जगातील सर्व
संपन्न राष्ट्र बनविण्यासाठी
कटिबध्द होऊया..
--प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙂

🙂 मुक्त आमचे आकाश सारे
झुलती हिरवी राने वने
स्वैर उडती पक्षी नभी
आनंद आज उरी नांदे
--प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙂

🙂 स्वातंत्र्यवीरांना करुया
शतशः प्रणाम
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच
भारत बनला महान..!
--प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🙂

🙂 जयोस्तुते श्रीमहन्मंगले !
शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवती !
त्वामहं यशोयुतां वंदे !
--प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🙂

🙂 खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे
प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे 🙂

                           
                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीवारसा.कॉम)
                      --------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-26.01.2022-बुधवार.