"26 जानेवारी - प्रजासत्ताक दिन"-हार्दिक शुभेच्छा-शुभेच्छा क्रमांक-5

Started by Atul Kaviraje, January 26, 2022, 02:58:55 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "26 जानेवारी - प्रजासत्ताक दिन"
                                           हार्दिक शुभेच्छा
                                         शुभेच्छा  क्रमांक-5
                                --------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज बुधवार, दिनांक-२६ जानेवारी, २०२२ आहे. "आपला भारत १५ ऑगष्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. पण त्याची लोकशाही राज्य घटना २६ जानेवारी १९५० रोजी अमलात आली. म्हणून हा 'प्रजासत्ताक दिन' म्हणून मानला जातो. आपला  भारत हे एक मोठे लोकशाही राज्य आहे म्हणजे हे लोकांचे, लोकांनी,लोकांसाठी चालविलेले राज्य आहे." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवयित्रींनी आजच्या या ७५ व्या प्रजासत्ताक दिवसाच्या हार्दिक शभेच्छा, या सुमुहूर्तावर वाचूया, महत्त्वाची माहिती, लेख, इतिहास, भाषण, निबंध, शुभेच्छा, आणि बरंच काही.

                 प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा –

     We will celebrate 71st Republic day on 26 January 2020 . Here we are giving latest & famous republic day marathi sms, marathi wishes, marathi sms, marathi shayari, marathi status & marathi quotes. You can share these with your friends, relatives, brother, sister, mother, father, husband & wife, on whatsapp, facebook & instagarm.


उत्सव तीन रंगांचा
आभाळी आज सजला
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी
ज्यांनी भारत देश घडविला...
भारत देशाला मानाचा मुजरा!

*****
"अवघ्या जगाला मार्गदर्शक ठरणाऱ्या भारतीय लोकतंत्राच्या प्रजासत्ताकदिन चिरायू होवो.
।।जय हिंद जय भारत ।।"

*****

देश विविध रंगाचा
देश विविध ढंगाचा
देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा
--प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा

*****

तिरंगी आमचा भारतीय झेंडा
उंच उंच फडकवू
प्राणपणाने लढून आम्ही शान याची वाढवू
या भारतमातेला
कोटी कोटी वंदन करूया
भारताला जगातील सर्व
संपन्न राष्ट्र बनविण्यासाठी
कटिबध्द होऊया..
--प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

*****

स्वप्न सगळेच बघतात
स्वत:साठी इतरांसाठी
आपण आज एक स्वप्न बघूया
देशासाठी
आपल्या सर्वांसाठी
सुरक्षित भारत, सुविकसित भारत
--प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

*****

असंख्यांनी केले सर्वस्व त्याग
तुझ्यासाठी अनेकांनी केले बलिदान
वंदन तयांसी करुनिया आज
गाऊ भारतमाताचे गुणगान
--प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

*****

घे तिरंगा हाती
नभी लहरू दे उंच उंच
जयघोष मुखी
जय भारत जय हिंद
गर्जु दे आसमंत
--प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

*****

मुक्त आमचे आकाश सारे
झुलती हिरवी राने वने
स्वैर उडती पक्षी नभी
आनंद आज उरी नांदे
--प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

*****

तनी मनी बहरू दे
नव जोम
होऊ दे पुलकित
रोम रोम
--प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


--पंकज  गोयल
---------------

                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-अजबगजब.कॉम)
                       ------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-26.01.2022-बुधवार.