"26 जानेवारी - प्रजासत्ताक दिन"-हार्दिक शुभेच्छा-शुभेच्छा क्रमांक-6

Started by Atul Kaviraje, January 26, 2022, 03:01:13 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "26 जानेवारी - प्रजासत्ताक दिन"
                                            हार्दिक शुभेच्छा
                                          शुभेच्छा  क्रमांक-6
                                 --------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज बुधवार, दिनांक-२६ जानेवारी, २०२२ आहे. "आपला भारत १५ ऑगष्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. पण त्याची लोकशाही राज्य घटना २६ जानेवारी १९५० रोजी अमलात आली. म्हणून हा 'प्रजासत्ताक दिन' म्हणून मानला जातो. आपला  भारत हे एक मोठे लोकशाही राज्य आहे म्हणजे हे लोकांचे, लोकांनी,लोकांसाठी चालविलेले राज्य आहे." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवयित्रींनी आजच्या या ७५ व्या प्रजासत्ताक दिवसाच्या हार्दिक शभेच्छा, या सुमुहूर्तावर वाचूया, महत्त्वाची माहिती, लेख, इतिहास, भाषण, निबंध, शुभेच्छा, आणि बरंच काही.

                 प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा---

     26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा केला जातो. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. पण त्याची लोकशाहीची राज्य घटना 26 जानेवारी 1950 रोजी अमलात आणली गेली. म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसापासून प्रजेची सुरुवात झाली म्हणून हा प्रजात्ताक दिन आहे. दरवर्षी प्रजासत्ताक दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अनेकांना प्रजासत्ताक दिनाचे महत्व अद्याप माहीत नाही. जर तुम्हाला याचे महत्व लोकांना जाणवून द्यायचे असेल तर तुम्ही प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा (Republic Day Wishes In Marathi) संदेश पाठवू शकता आणि या दिवसाचे महत्व अधोरेखित करु शकता. देशभक्ती जागृत करण्यासाठी देशभक्तीपर चित्रपट ही तुम्ही पाहू शकता

स्वतंत्र्यता घेण्याचे नाही तर देण्याचे नाव आहे – नेताजी शुभाष चंद्र बोस

चुका करण्याची मुभा आपल्याला नसेल तर आपल्याला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले नाही – महात्मा गांधी

या.. आपण सगळ्यांनी मिळून शांति, सद्भाव आणि प्रेमाने यात्रा सुरु करुया – अटल बिहारी वाजपेयी

हम पहले और आखिर में सिर्फ भारतीय हैं – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

नागरिकता देशाच्या सेवेसाठी वाहून घेतली पाहिजे – पंडीत जवाहरलाल नेहरु

न्याय आणि व्यवस्था हे राजकारणाचे महत्वाचे भाग आहेत. यापैकी एकही भागाला दुखापत झाली तरी औषध हे करावेच लागते – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

नव्या संविधानांतर्गत काही चुकीचे होत असेल तर याचा असा अर्थ नाही की संविधान चुकीचे आहे.. यामध्ये माणसाचे काहीतरी चुकत आहे – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

प्रजासत्ताकचा अर्थ एक राष्ट्र, एक भाषा आणि एक झेंडा – एलेग्जेंडर हेनरी

कोणत्याही राष्ट्राची संस्कृती ही तेथील लोकांच्या आत्मा आणि मनात वसलेली असते – महात्मा गांधीचे अनमोल विचार

सहिष्णुता आणि स्वतंत्रता हा प्रजासत्ताकाचा मजबूत पाया आहे – फ्रैंक लॉयड राइट

                     प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा संदेश

पुन्हा एकदा एकमेकांचा आदर करत आणि आपल्या देशाचा मान वाढवण्याची शप्पथ घेऊया... प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

देशाने तुमच्यासाठी काय केले हे विचारण्यापेक्षा तुम्ही देशासाठी काय करत आहात ते स्वत:ला विचारा... प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

आपल्या पूर्वजांनी आपल्याला चांगला इतिहास दिला आहे... तुम्ही तो इतिहास कायम जागा ठेवा... प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

आपल्या देशात विविधता आहे आणि ती तशीच कायम टिकवून राहावे. देशातील सलोखा वाढावा. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

परिवर्तनाचे नेतृत्व करा आणि देशातील शांतता टिकवून ठेवा.. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आपल्या जीवनात अनेक रंग भरलेले आहेत... मला आशा आहे की, हा प्रजासत्ताक दिन तुमच्या आयुष्यात अधिक रंग घेऊन येईल. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

गर्वाने बोला भारतीय आहे मी.... प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

उत्सव तीन रंगाचा, आभाळी आज सजला,  नतमस्तक मी त्या सर्वांसाठी.. ज्यांनी भारत देश घडवला... प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो. समस्त देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

देश विविध रंगाचा,ढंगाचा.. विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा... प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


--लीनल  गावडे
---------------


                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                 -----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-26.01.2022-बुधवार.