"26 जानेवारी - प्रजासत्ताक दिन"-प्रजासत्ताक दिनाच्या स्टेटस

Started by Atul Kaviraje, January 26, 2022, 03:08:57 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "26 जानेवारी - प्रजासत्ताक दिन"
                                    प्रजासत्ताक दिनाच्या स्टेटस
                               --------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज बुधवार, दिनांक-२६ जानेवारी, २०२२ आहे. "आपला भारत १५ ऑगष्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. पण त्याची लोकशाही राज्य घटना २६ जानेवारी १९५० रोजी अमलात आली. म्हणून हा 'प्रजासत्ताक दिन' म्हणून मानला जातो. आपला  भारत हे एक मोठे लोकशाही राज्य आहे म्हणजे हे लोकांचे, लोकांनी,लोकांसाठी चालविलेले राज्य आहे." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवयित्रींनी आजच्या या ७५ व्या प्रजासत्ताक दिवसाच्या हार्दिक शभेच्छा, या सुमुहूर्तावर वाचूया, महत्त्वाची माहिती, लेख, इतिहास, भाषण, निबंध, शुभेच्छा, आणि बरंच काही.

                     प्रजासत्ताक दिनाच्या स्टेटस---

देशभक्ती ही क्षुल्लक कारणासाठी मरण्याचा हक्क आहे...प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

स्वर्गाहुनी प्रिय आम्हाला अमुचा सुंदर देश ..आम्ही सारे एक. .. जरी नाना जाती नाना वेष...

गांधी का सपना सत्य बना... तभी तो देश गणतंत्र बना

या भारतमातेला कोटी वंदन करुया... तिच्या रक्षणासाठी अगदी काहीही करुया

सीमेवर शिपाई रक्षा करतात देशाची... आपण रक्षा करुया या देशाची संविधानाची

गणतंत्र दिवस म्हणजे काय ते माहीत नसेल तर आजच जाणून घ्या कारण याच दिवसामुळे देशात बदल घडला

तुम्ही तुमचा वाढदिवस विसरला तरी चालेल... पण तुम्ही 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी कधीच विसरु नका.

देशाचे संविधान म्हणजे साधीसुधी गोष्ट नाही... त्याचा मान ठेवा...

देशात प्रेम नांदायला हवे हिंसा नाही... प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

तुमच्या मनात तिरंगा असेल तर तुम्हाला कशाचीही भीती नाही...

स्वातंत्र्य दिन शुभेच्छांप्रमाणेच आपण प्रजासत्ताक दिनालाही आवर्जून स्टेटस ठेवतोच. मग खास प्रजासत्ताक दिनाला ठेवा हे व्हॉटसअॅप स्टेटस.

आम्हाला आमच्या देशाच्या संविधानाचा अभिमान आहे.... प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
भारतीय प्रजासत्ताक दिन चिरायू होवो!

मुक्त आमुचे आकाश सारे...झुलती हिरवी राने वने...स्वैर उडती पक्षी नभी...आनंद आज उरी नांदे !!

रंग बलिदानाचा... रंग शांततेचा...रंग मातीच्या नात्याचा

या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी केला होता त्याग...वंदन करुया तयांसी आज

खरा प्रजासत्ताक तेव्हाच साजरा होईल जेव्हा संविधान कागदावर न राहता त्यातील प्रत्येक अधिकार सामान्य माणसाला बजावता येईल. आपण सर्वांनी मिळून त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

भारताला सलाम! जिथे प्रत्येक अंकुर त्याच्या खरा रंगांमध्ये,जेथे प्रत्येक दिवस एकतेचा उत्सव साजरा करतात,प्रजासत्ताक दिवस सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

प्रजासत्ताक तुझा, माझा आणि आपल्या लोकशाहीचा

प्रजासत्ताक दिनी ठरवूया मनी.... देशासाठी करु काहीतरी..

आम्ही या देशाची तरुण पिढी शपथ घेत आहोत की, आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत आमच्या भारत मातेचे संरक्षण करु !!
प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा!

तनी  मनी बहरु दे नवा जोश...होऊ दे पुलकीत रोम रोम... प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

घे तिरंगा हाती..नभी लहरु दे उंच... जयघोष मुखी... जय भारत... जय हिंद... प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

वाऱ्यामुळे नाही...सैनिकांच्या जोशामुळे लहरतोय हा तिरंगा... असाच टिकून राहू दे त्यातील जोश
प्रजासत्ताक दिन आणि संविधान दिनाच्या शुभेच्छा!

झेंडा उँचा रहे हमारा....प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

देश विविधतेचा.. देश माझा... प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

देशात शांती आणि समृद्धी टिकून राहू दे... प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

असंख्यांनी केले तुझ्यासाठी बलिदान...गाऊ त्या भारतमातेचे गुणगान

देश विविधता जाणणाऱ्या एकात्मतेचा... प्रजासत्ताक दिन चिरायू होवो


--लीनल  गावडे
---------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                   ----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-26.01.2022-बुधवार.