"26 जानेवारी - प्रजासत्ताक दिन"-देशभक्तिपर कविता -2

Started by Atul Kaviraje, January 26, 2022, 04:40:25 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "26 जानेवारी - प्रजासत्ताक दिन"                           
                                         देशभक्तिपर कविता-2
                                 -------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज बुधवार, दिनांक-२६ जानेवारी, २०२२ आहे. "आपला भारत १५ ऑगष्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. पण त्याची लोकशाही राज्य घटना २६ जानेवारी १९५० रोजी अमलात आली. म्हणून हा 'प्रजासत्ताक दिन' म्हणून मानला जातो. आपला  भारत हे एक मोठे लोकशाही राज्य आहे म्हणजे हे लोकांचे, लोकांनी,लोकांसाठी चालविलेले राज्य आहे." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवयित्रींनी आजच्या या ७५ व्या प्रजासत्ताक दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, या सुमुहूर्तावर वाचूया काही देशभक्तिपर कविता.

              प्रजासत्ताक दिनासाठी देशभक्तिपर कविता---

5. झेंडा आमुचा प्रिया देशाचा
फडकत वरी महान
करितो आम्ही प्रणाम याला
करितो आम्ही प्रणाम
लढले गांधी याच्याकरिता
टिळक, नेहरू लढली जनता
समरधूरंधर वीर खरोखर
अर्पुनि गेले प्राण
करितो आम्ही प्रणाम याला
करितो आम्ही प्रणाम
भारतमाता आमुची माता
आम्ही गातो या जयगीता
हिमालयाच्या उंच शिरावर
फडकत राही निशाण
करितो आम्ही प्रणाम याला
करितो आम्ही प्रणाम
या देशाची पवित्र माती
जूळती आमुच्या मधली नाती
एक नाद गर्जतो भारता
तुझा आम्हा अभिमान
करितो आम्ही प्रणाम याला
करितो आम्ही प्रणाम
गगनावरी आणि सागरतिरि
सळसळ करिती लाटा लहरी
जय भारत जय, जय भारत जय, गाता ती जयगान
करितो आम्ही प्रणाम याला
करितो आम्ही प्रणाम


--लीनल  गावडे
---------------


                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                    ----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-26.01.2022-बुधवार.