कोरोना चारोळ्या-"कोरोनाने बारची द्वारे बंद केलीत,आता नवीन द्वारे खुली(ओपन)झालीत"

Started by Atul Kaviraje, January 30, 2022, 01:32:03 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

    विषय :कोरोनामुळे  बार  सारे  बंद  पडलेत ,आता  ओपन  बार  सुरु  झालेत
               कोरोना  वास्तव  मार्मिक  दारूचा  गुत्ता (बार) चारोळ्या
        "कोरोनाने बारची द्वारे बंद केलीत,आता नवीन द्वारे खुली(ओपन)झालीत"
  ----------------------------------------------------------------------


(1)
गावाच्या  "दारूच्या  गुत्त्याचा"  लाईफ  मेम्बर  मी
"कोरोनामुळे  बारवर"  कायमचे  सावट  आलेय
काहीही  होवो , बाटली  नाही  सोडणार , मी  पिणार ,
गावच्या  चावडीवरच  मी  नवीन  "ओपन  बारचे"  उद्घाटन  केलंय .

(2)
हे  व्यसन  आहे , न  सुटणारे , न  संपणारे
"बार  बंद"  पडल्यावर  कासावीस  झालेत , तळीराम  सारे
"बारमधले"  स्वातंत्र्य  हिरावून  घेतलंय  या  "कोरोनाने" , पिण्याचे ,
भले  मोठे  झाड  निवडलंय  त्यांनी  पिण्यास , वट-वृक्षाचे .

(3)
पण  तिथेही  आहे  कायम  पोलिसांचा  ससेमिरा
"बंद  बारमध्येही"  होता , आता  "ओपन  बारमध्येही"  आहे
पण  आपले  लक्ष्य  साध्य  करण्यास  माझी ,
कोणत्याही  थराला  जाण्याचीही  तयारी  आहे  !

(4)
दोन  पेग  रिचवल्याशिवाय  मला  झोप  येत  नाही
गेल्या  कित्येक  वर्षांचा  आहे  हा  परीपाठ
"कोरोनात"  तरी  सुधारेल  हा  पठ्ठा ,माझ्या  बायकोला  वाटतंय ,
स्वतःच  उगी  राहते  मग ,गिरवताना  पाहून  मला  तोच -तोच  पाठ .

(5)
"कोरोना"  काही  जात  नाही , बस्तान  त्याचे  वाढलंय
माझ्या  "ओपन  बारचे"  आज  आधुनिकीकरण  झालंय
"कोरोना"  काही  जात  नाही , आणि  मी  पिण्याचे  काही  सोडत  नाही ,
माझ्या  या  "ओपन  बारला"  आजवर  कधीच  टाळे  लागले  नाही .


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.01.2022-रविवार.