"संपहटवा नाहीतरकरू तुमच्या बदल्या,STकर्मचाऱ्यांनी बदली-पत्रांच्या केल्या होळ्या"

Started by Atul Kaviraje, January 31, 2022, 01:32:25 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

   विषय : सोलापूर  येथे  ST कर्मचाऱ्यांनी , बदलीच्या  आदेशाची  होळी  केली .
           वास्तव -ST कर्मचाऱ्यांच्या  बदली  आदेशांची  होळी -चारोळ्या
"संप हटवा नाहीतर करू तुमच्या बदल्या,STकर्मचाऱ्यांनी बदली-पत्रांच्या केल्या होळ्या" --------------------------------------------------------------------------


(1)
सरकारची  निर्णय  घेण्याची  क्षमता  नाही , उलट  दुटप्पी  वर्तन  वाढू  लागलय
वचपा काढायचा,बदलI घ्यायचा,पण नमते काही घ्यायचे नाही, कमीपणा  बिलकुल  नाही
या संपकरी ST कर्मचाऱ्यांना  चांगलाच  धडा  शिकवायचा , बधत  नाही  म्हणजे काय ?
असे  म्हणत  सरकारने , ST कर्मचाऱ्यांच्या  "बदल्यांचा"  फैसला  कायम  केलाय .

(2)
संपकरी  ST कर्मचाऱ्यांचे  "बदली" -पत्र , सरकारने  जाहीर  केलंय
या  मुजोर  संपकरीनI धडा  शिकवण्याचा  त्यांनी  अंतिम  निर्णय  घेतलाय
बडतर्फीची  शिक्षा ,निलंबनाची  सजा , कमी  पडली  म्हणून  की  काय ,
त्यांनी  ST कर्मचाऱ्यांचा  त्वरित  "बदली"  आदेश  बैठकीत  पास  केलाय .

(3)
पण  बधतील  ते  ST कर्मचारी  कसले  हो , त्यांना  सरकार  माहित  झालेय
पूर्वसूचना  असल्याप्रमाणेच  त्यांनी  हे  "बदली" -शिक्षा -पत्र  मुकाट  स्वीकारलेय
निर्भत्सना  करीत ,उपमर्द  करीत , त्यांनी  या  नाकर्त्या  सरकारचा  निषेध  केलाय ,
संतप्त  ST कर्मचाऱ्यांचा  हा  अति -तीव्र ,उग्र  संप  अधिकच  भडकत  चाललाय .

(4)
निलंबन  पत्राला  त्यांनी  धगधगत्या  निखाऱ्यात  केले  होते  स्वाहा  तेव्हा
आता  या  "बदली"  हुकूमपत्राची ,आदेशाचीही  ते  करताहेत  होळी
म्हणती , तुमच्या  या  पोकळ  धमक्यांना  आम्ही  नाही  घाबरत , आम्ही  नाही  भित्रे ,
गप्प  नाही  राहणार , गिळून  नाही  मुकाट  बसलोय  आम्ही  कायरतेची  गोळी .

(5)
म्हणती , तुमची  हि  हुकूमशाही ,दडपशाही , यापुढे  चालू  देणार  नाही , कदापि  नाही
ही  पहा  केलीय  तुमच्या  "बदली" -पत्राची  होळी , निर्भयतेने , निडरतेने
करा  कुठेही  "बदल्या"  आमच्या , माघार  घेणार  नाही , संप  सुरूच  राहील ,
जिथे  आहोत  तिथून , आमची  घोषणा  सतत  तुमचा  पाठलाग  करीत  राहील .

(6)
राख-रांगोळी करीत होती,भसम  करीत  होती , ही  होळी  त्यांच्या  "बदली" -आदेशाची
एक अदम्य आत्म-विश्वास , स्वाभिमानाची  जाज्वल्य ज्योत , त्यांच्या  मनात  जागत  होती
आता माघार  घेणे  नाही , विलीनीकरण  करूनच  दाखवू  तुम्हाला , नव्हे  ते  होईलंच ,
असा  दाखवू  मराठी  बाणा  की ,सारे  जग  तोंडात  बोटे  घालून  राहिलंच .


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-31.01.2022-सोमवार.