सर्पराज्ञी

Started by vishal maske, February 01, 2022, 03:47:28 PM

Previous topic - Next topic

vishal maske

सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्र तागडगाव, ता.शिरूर (का), जिल्हा. बीड चे संस्थापक सिध्दार्थ सोनवणे यांना उद्देशुन कवी अँड. विशाल मस्के यांची कविता

*सर्पराज्ञी*

मोडलेल्या पाखरांचा
सक्षम पाय आहेस तु
वेदनांकित प्राण्यांची
प्रेमळ माय आहेस तु

तुझ्या मायेच्या छायेत
निसर्ग शांत विसावतोय
तु घेतोस कष्ट म्हणून
निसर्ग संथ सुखावतोय

आहेच तरी काय तुझे
इथे या निसर्गा शिवाय
फाटता निसर्ग शिवायला
निसर्गाला ही तुच हवाय

तुझ्या या परिश्रमाचे फळ
ना आंबट, गोड, तुरट आहे
पण डोळसास दिसु शकते
हा निसर्ग आज स्फुरत आहे

मुक्या प्राणांचे बोलके भाव
मनालाही अबोल करतात
अन् तुझे त्यांचे प्रेम पाहून
मानवी मनंही गहिवरतात

त्या प्राणांची सेवा करण्या
तुझ्या प्राणाची काहिली रे
तुझी ती वनवन कण कण
आज मी देखील पाहिली रे

तुझे प्राणी, तुझे पक्षी
आणि तुझे झाडे सारी
प्रत्येकाला आपले व्हावे
हिच तुझी शिकवण खरी

पैसा, पद आणि प्रतिष्ठेमागे
हि दुनिया जरी धावती आहे
पण निस्वार्थ आणि निरागस
हिच तर तुझी पावती आहे

प्राणी, पक्षी, वृक्षांनाही
अभय मिळावे सदनी
निसर्गाला ही हवी आहे
तुझ्या मायेची सर्पराज्ञी


अँड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३