हेल्मेट-चारोळ्या-"हेल्मेटघाला,डोके सुरक्षितठेवा,परीक्षा पास व्हा,गाडी परत मिळवा"

Started by Atul Kaviraje, February 02, 2022, 01:27:29 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

 विषय : नाशिक  येथील  एक  अनोखा ,अजब  कायदा . हेल्मेट  न  घालणाऱ्या  चालकांना  परीक्षा  द्यावी लागतेय , व  परीक्षा  पास  झाल्यावर  त्यांना त्यांचे  वाहन  परत  दिले जातेय .
           वास्तव -मार्मिक -वाहन -धारकांना  हेल्मेट सक्ती-चारोळ्या .
                             ट्राफिक  पोलिसांचे  मनोगत
      "हेल्मेट घाला,डोके सुरक्षित ठेवा,परीक्षा पास व्हा,गाडी परत मिळवा!"
--------------------------------------------------------------------------


(1)
नाशिकमध्ये  आलाय  अजब  कायदा , "हेल्मेट"  न  घालणाऱ्यांवर
सारे उपाय थकले , इतर  शिक्षांचाही  नाही असर  होत , या  विना -"हेल्मेट"  धारकांवर
ट्राफिक  पोलिसांनी उघडलीय  शाळा , पेपर  वाटताहेत  "परीक्षेचे"  या  चालकांना ,
उत्तरे  लिहा , पास  झालात  तरच  पुन्हा  मिळेल  तुम्हा  तुमचे  वाहन , सह -परवाना .

(2)
"हेल्मेट"  नाही ,चल उतर   ,बस  "परीक्षेस" ,ही  घे  प्रश्न -पत्रिका
पेन  घे ,उत्तरे  लिही ,कॉपी  करू  नकोस ,लागलीच  तर  मिळेलही उत्तर  पुरवणीका
अजब  राजाची  ही  गजब  शिक्षा , मुकाट  भोगताहेत  ही  वाहन -चालक  प्रजा ,
झक  मारली  अन ,बुद्धी  नाही  झाली  "हेल्मेटची" ,आता  भोगI  मुकाट  सजा  !

(3)
ट्राफिक  पोलीस  म्हणती , पास  झालात ,उत्तीर्ण  झालात  तर  बक्षीस  मिळणार  नाही
तुमचेच  वाहन  तुम्हा  मिळेल  परत , करू  नका  तुम्ही  उत्तराची  घाई
अनुत्तीर्ण झालेल्यानी आपल्या पायांनी  चालत  घरी  जा , कोणतीही  गय  होणार  नाही ,
पास  होईपर्यंत  तुमचे  वाहन , आमच्याकडे  सुरक्षित , आमच्या  ताब्यात  राही .

(4)
पहा  केवढ्याला  पडलीय  या  विना -"हेल्मेट"  धारकांना  ही  अजब  शिक्षा
ट्राफिक  पोलीस  शिकवताहेत  त्यांना  या  "परीक्षेतून"  धडा , देताहेत  त्यांना  दीक्षा
तुमचेच  डोके  राहील  धडावर  सुरक्षित , नेहमीच  पाळI  तुम्ही  रस्त्यावरले  नियम ,
न  पाळले  तर , बसलाय  तिथे  कोपऱ्यावर , वाट  पहाट  तुमची  खुद्द  यम.

(5)
तुमच्या  आयुष्याचाच  हा  आहे  प्रश्न ,पुनः  जीवन  मिळणार  नाही
वाहन -धारकांनो  "हेल्मेट"  घाला ,सुरक्षित  वाहन  चालवा , भन्नाट  वेग  टाळा
अन्यथा  जीवास  मुकाल ,अपघात  काही  सांगून  होत  नसतात , पूर्वसूचना  न  देता ,
जीवन -सुरक्षेचे  हे  शिरस्त्राण  घालण्याचा  तुम्हाला  का  हो  एवढा  कंटाळा  ?

(6)
जीवनात  तुम्ही  दिल्यात  "परीक्षा"  बऱ्याच ,उत्तीर्ण  होऊनच  पुढे  आलात
मग  आता  असे  का,  "हेल्मेट"  न  घालताच तुम्ही,  पुढे  कसे  काय  चाललात  ?
नियमांचे  पालन  करा ,अपघात  टाळा ,स्वतःला  आणि  दुसऱ्यांनाही  सुरक्षित  ठेवा ,
हे  प्रश्नोत्तरांचे  फक्त  निमित्त  आहे , आता  तरी  यातून  तुम्ही  शहाणे  व्हा  !


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-02.02.2022-बुधवार.