जगण्यासाठी धडपड करावी लागते....

Started by Rushi.VilasRao, February 02, 2022, 11:02:42 AM

Previous topic - Next topic

Rushi.VilasRao

जन्माला येतो माणूस निवांत असत आयुष्य....
वय हळू हळू वाढत जात... वाढत अपेक्षांचं ओझ...

लाड आईबाप पुरवतात तोवर उणीव कसलीच भासत नाही...
स्वतः कमवायची जेव्हां वेळ येते बोनस सुद्धा पुरत नाही...
writer:- rushikesh kadam(मी स्वत:च)
पगार दर महिन्याला हातात येतो,
नियोजन पुरेपूर करावं लागत...
हलगर्जी पणा चालत नाही....
वायफळ खर्च केलाच कुठे तर महिना अखेरीस काय खर नाही....

रोज सकाळी लवकर उठून कामावर वेळेवर जावं लागते...
काल अर्धवट सोडलेली फाईल आज नव्याने पूर्ण करावी लागते....

कामाचा त्रान कोणाला सांगता येत नाही...
मूग गिळून शांत बसावे लागते...
काम करता करता अचानक मन बालपणीच्या आठवणीत रमून जाते...

बालपण खरच खूप छान होते...
उगाच मोठं व्हायची ओढ लागते...
मोठं झाल्यावर माञ आता....
जगण्यासाठी धडपड करावी लागते....
writer:- rushikesh kadam(मी स्वत:च)
Follow on Instagram for awesome posts @Krushi_bhaijaan