"०२-फेब्रुवारी –दिनविशेष"

Started by Atul Kaviraje, February 02, 2022, 11:18:27 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०२.०२.२०२२-बुधवार. जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"


                                     "०२-फेब्रुवारी –दिनविशेष"
                                    -------------------------


अ) ०२ फेब्रुवारी रोजी झालेल्या घटना.
   ------------------------------

१८४८: कॅलिफोर्निया गोल्ड रश – सोने मिळवण्याच्या उद्देशाने चिनी स्थलांतरितांचा पहिला जथा कॅलिफोर्नियात दाखल झाला.

१९३३: अ‍ॅडॉल्फ हिटलरने जर्मनीची संसद बरखास्त केली.

१९४३: दुसरे महायुद्ध – स्टॅलिनग्राडच्या लढाईनंतर जर्मनीचे सैन्य सोवियेत संघाला शरण, जर्मन सैन्याच्या माघारीची सुरूवात झाली.

१९५७: गोवा मुक्तीसंग्राम – नानासाहेब गोरे, मधू लिमये, जगन्नाथराव जोशी यांची गोव्यातील तुरूंगातुन मुक्तता.

१९६२: ४०० वर्षांनंतर नेपच्यून व प्लूटो हे ग्रह एका रेषेत आले.

१९७१: इराणमधील रामसर येथे पाणथळ भूमीचे महत्त्व या विषयावर एक परिषद आयोजित करण्यात आली होती. मानवी जीवनातील पाणथळ भूमीचे महत्त्व समजावे म्हणून दरवर्षी २ फेब्रुवारी हा दिवस जगभर जागतिक पाणथळ भूमी दिन म्हणून साजरा केला जावा असा त्या परिषदेत निर्णय घेण्यात आला.

१९७१: इदी अमीन हे युगांडाचे सर्वेसर्वा बनले.

=========================================

ब) ०२ फेब्रुवारी रोजी झालेले जन्म.
   ---------------------------

१७५४:  फ्रान्सचे पंतप्रधान चार्ल्स मॉरिस डी टॅलीरॅड यांचा जन्म. (मृत्यू: १७ मे १८३८)

१८५६: स्वामी दयानंदांचे शिष्य, गुरुकुल विश्वविद्यालयाचे संस्थापक, शिक्षणमहर्षी आणि आर्य समाजाचे प्रसारक स्वामी श्रद्धानंद यांचा जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर १९२६)

१८८४: ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांचा जन्म. (मृत्यू: १० एप्रिल १९३७ – पुणे)

१८९७: हॉवर्ड जॉन्सन कंपनीचे संस्थापक हॉवर्ड डीरिंग जॉन्सन यांचा जन्म. (मृत्यू: २० जून १९७२)

१९०५: जन्माने रशियन असलेल्या अमेरिकन लेखिका व तत्त्ववेत्त्या अ‍ॅन रँड यांचा जन्म. (मृत्यू: ६ मार्च १९८२)

१९२२: भारतीय फील्ड हॉकीपटू कुंवर दिग्विजय सिंग यांचा जन्म. (मृत्यू: २७ मार्च १९७८)

१९२३: केंद्रीय रेल्वे मंत्री, गृह राज्यमंत्री, अर्थ राज्यमंत्री, पहिल्या, दुसर्‍या व पाचव्या लोकसभेचे सदस्य, राज्यसभा खासदार ललित नारायण मिश्रा यांचा जन्म. (मृत्यू: ३ जानेवारी १९७५ – समस्तीपूर, बिहार)

१९२५: आधुनिक घरवल लोकसंगीताचे जनक जीत सिंग नेगी यांचा जन्म. (मृत्यू: २१ जून २०२०)

१९३२: पद्मभूषण पुरस्कार विजेते प्रख्यात भारतीय गणितज्ञ व चेन्नई मॅथेमॅटिकल इन्स्टिट्यूटचे संस्थापक सी. शेषाद्री यांचा जन्म. (मृत्यू: १७ जुलै २०२०)

१९७९: अभिनेत्री शमिता शेट्टी यांचा जन्म.

=========================================

क) ०२ फेब्रुवारी रोजी झालेले मृत्यू.
   ----------------------------

१९०७: रशियन रसायनशास्त्रज दिमित्री मेंदेलिएव्ह याचं निधन. (जन्म: ८ फेब्रुवारी १८३४)

१९१७: लोकमान्य टिळकांचे स्‍नेही आणि विख्यात वैद्य महर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांनी देहत्याग केला. (जन्म: ४ मे १८४७)

१९३०: लेखक, भाषांतरकार, पत्रकार, संपादक, अनुवादक, निबंधकार व कोशकार वासुदेव गोविंद आपटे याचं निधन. (जन्म: १२ एप्रिल १८७१)

१९७०: ब्रिटिश गणितज्ञ, तत्त्वज्ञ आणि इतिहासकार बर्ट्रांड रसेल याचं निधन. (जन्म: १८ मे १८७२)

१९८७: स्कॉटिश साहसकथा लेखक अ‍ॅलिएस्टर मॅकलिन याचं निधन. (जन्म: २१ एप्रिल १९२२)

२००७: हिन्दी चित्रपट आणि टीव्ही अभिनेता विजय अरोरा याचं निधन. (जन्म: २७ डिसेंबर १९४४)

=========================================



-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-02.02.2022-बुधवार.