II माघी गणेश जयंती II-शुभेच्छा क्रमांक-1

Started by Atul Kaviraje, February 04, 2022, 12:10:56 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      II माघी गणेश जयंती II
                                          शुभेच्छा क्रमांक-1
                                    ------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

          आज शुक्रवार,०४ फेब्रुवारी ,२०२२ . माघ शुद्ध चतुर्थी अर्थात माघ महिन्यातील श्रीगणेश जयंती. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवयित्रींना, या माघी गणेश जयंतीच्या मनापासून शुभेच्छा. त्या बाप्पाला नमन करून वाचूया, माघी गणेश जयंतीवर लेख, माहिती, पूजा विधी, कथा, शुभेच्छा, कविता आणि बरंच काही.

      बाप्पा खूप आतुरता लागली आहे तुझ्या आगमनाची ,पूर्ण वर्ष वाट पहिली आता नाही राहवत, तुझ्याशी खूप सार्‍या गोष्टी share करायचे आहेत कारण त्याचे solution पण तुझ्याकडे आहे हे माहीत आहे ,हयावर्षी प्रत्येक घरात वेगळी आरास बघायला भेटेल कारण thermocol पण बंद झाले आहेत ना ,आम्ही आता तयारी चालू करतो तू आपल्या वेळेनुसार ये जास्त वेळ लावू नकोस .


बाप्पा सगळ्यांच्या आयुष्यात सुख दे
आणि त्यानां कुठल्याही परिस्थितीतून
बाहेर पडण्याची शक्ती दे ,
तुला तर सगळं माहीत आहे असतं ना
पण जे होईच असतं ते होतच ना ,
तुझ्या येण्याने सगळ्यांच्या घरात
आंनद आणि समृद्धी नांदूदे.

स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही
ते तुझ्या चरणाशी आहे.
कितीही मोठी समस्या असुदे बाप्पा
तुझ्या नावातच समाधान आहे.

बाप्पा एक तूच आहेस जो
सोबत राहायचं प्रॉमिस देत नाही
पण साथ माझी कधी सोडत नाही.

कोणतीही येऊदे समस्या
तो नाही सोडणार आमची साथ
अशा आमच्या गणरायाला नमन
करितो जोडुनी दोन्ही हाथ.

माझं आणि बाप्पाचं खूप छान नातं आहे
जिथे मी जास्त मागत नाही
आणि बाप्पा मला कधी कमी पडू देत नाही.

फुलांची सुरुवात कळीपासून होते,
जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते
प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते,
आणि आपली कामाची सुरुवात
श्री गणेशा पासून होते.
गजानन तू गणनायक.

विघ्नहर्ता तू विघ्नविनाशक.....
तूच भरलासी त्रिभुवनी,
अन उरसी तूच ठायी ठायी....
जन्मची ऐसे हजारो व्हावे,
ठेविण्या मस्तक तूज पायी.

हरिसी विघ्न जणांचे,
असा तू गणांचा राजा
वससी प्रत्येक हृदयी,
असा तू मनांचा राजा
स्वीकार गणराया तुझिया चरणी,
साष्टांग दंडवत माझा...


--सचिन वर्दे
-----------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-लाईफ हॅकर मराठी.कॉम)
                 --------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-04.02.2022-शुक्रवार.