II माघी गणेश जयंती II-शुभेच्छा क्रमांक-3

Started by Atul Kaviraje, February 04, 2022, 12:14:14 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     II माघी गणेश जयंती II
                                         शुभेच्छा क्रमांक-3
                                  -------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

          आज शुक्रवार,०४ फेब्रुवारी ,२०२२ . माघ शुद्ध चतुर्थी अर्थात माघ महिन्यातील श्रीगणेश जयंती. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवयित्रींना, या माघी गणेश जयंतीच्या मनापासून शुभेच्छा. त्या बाप्पाला नमन करून वाचूया, माघी गणेश जयंतीवर लेख, माहिती, पूजा विधी, कथा, शुभेच्छा, कविता आणि बरंच काही.

बाप्पा तू कधी येशील रे
आता तुला बघण्यासाठी आमचेही डोळे अIसुसलेत
बघ जरा वेळ भेटला तर
ये लवकर खूप बोलायचं आहे तुझ्याबरोबर
जे मागे नाही बोलू शकलो
आणि या वेळी थोडी जास्त सुट्टी काढून येना
आम्हाला ही बरं वाटलं.

चला उठा आता
बाप्पा च्या आगमनाची तयारी चालू करायची आहे
झोपून नाही चालणार ,
खूप कमी दिवस राहिलेत
मग मज्जा ही आपणच करणार आहोत ..✌️

बाप्पाच्या आगमनाने आपल्या जीवनात
भरभरून सुख समृध्दी ऐश्वर्या येवो..
हीच गणरायाकडे प्रार्थना!
माघी गणेश जयंतीच्या तुम्हा सर्वाना खूप खूप
शुभेच्छा!

जडलाय तुझ्या नव्या रूपाचा ध्यास"
पूर्ण कर बाप्पा आता भक्तांची आस!!!
आतुरता आगमनाची.
गणपती बाप्पा मोरया.

देव येतोय माझा...
आस लागली तुझ्या दर्शनाची,
तुला डोळे भरून पाहण्याची,
कधी उजाडेल ती सोनेरी पहाट,
गणराया तुझ्या आगमनाची...
माघी गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

हे गणराया संपूर्ण भारत देशात आलेल्या
कोरोना सारख्या भयानक रोगापासून
संपूर्ण देशाला मुक्त कर हिच तुझ्या चरणी प्रार्थना..
माघी गणेश जयंती निमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा

मोदकांचा प्रसाद केला
लाल फुलांचा हार सजवला
मखर नटून तयार झाले
वाजत गाजत बाप्पा आले
गुलाल फुले अक्षता उधळे
बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे...
सर्व गणेश भक्तांना माघी गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत ,
सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य,शांती,आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना. "
गणपती बाप्पा मोरया , मंगलमुर्ती मोरया !!!


--सचिन वर्दे
------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-लाईफ हॅकर मराठी.कॉम)
                 --------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-04.02.2022-शुक्रवार.