II माघी गणेश जयंती II-शुभेच्छा क्रमांक-5

Started by Atul Kaviraje, February 04, 2022, 12:17:09 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       II माघी गणेश जयंती II
                                           शुभेच्छा क्रमांक-5
                                     ------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

          आज शुक्रवार,०४ फेब्रुवारी ,२०२२ . माघ शुद्ध चतुर्थी अर्थात माघ महिन्यातील श्रीगणेश जयंती. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवयित्रींना, या माघी गणेश जयंतीच्या मनापासून शुभेच्छा. त्या बाप्पाला नमन करून वाचूया, माघी गणेश जयंतीवर लेख, माहिती, पूजा विधी, कथा, शुभेच्छा, कविता आणि बरंच काही.

किती पाप किती पुण्य,
कोणाचे कोणालाच स्मरण नाही .
विरह ही आहे कोठे कोठे,
सार्‍यांनाच प्रेमाचे शरण नाही .
सुटेल हा देह एक ना एक दिवस,
कोणाच्याच नशिबी अमृताचे धरण नाही .
कळ्यांचं आयुष्य फुलांन पर्यंत मर्यादित,
पण काट्याला काही मरण नाही .
आणि प्रत्येक फुलांच्या नशिबी,
देवा तुझे चरण नाही.

त्यांनी विचारले :- काय मागितलेस गणपती बाप्पा कडे ?
मी म्हणालो :- काहीच नाही मागितल...
जे आजपर्यंत दिले, त्यासाठी आभार मानले.

उत्सव हा मराठ्यांचा,
उत्सव हा प्रेमाचा,
सोहळा आहे गणपती आगमनाचा,
सुखाचा व समृद्धीचा.
हे गणराया संपूर्ण जगात पसरलेल्या कोरोनासारख्या,
भयानक रोगापासून संपूर्ण जगाला,
मुक्त कर हीच, तुझ्या चरणी प्रार्थना....

अपराध भक्तांचे, उदरात साठवितो,
लंबोदर हे तुझे, प्रार्थना भक्त करतो,
कीर्ती त्रिभुवनी गाजे, वरदान गजानन देतो,
समाधानी मन होते हे, लंबोदर तू तोषतो.

64 कलांचा स्वामी हा भाग्यविधाता,
कलात्मकतेचे दान द्याया आलाय आज विघ्नहर्ता.

बाप्पाच्या रूपात लोकांच्या सेवेसाठी धावलेल्या,
डॉक्टर ,नर्स ,पोलीस यांचे तो आभार मानेल,
मनुष्याचा गर्वहरण झाल,असं समजून,
गालातल्या गालातच हसेल.

नाव घेऊनी मोरयाचे मुखी,
मन वाट पाहते फक्त तुझ्या आगमनाचे..

तुमच्या आयुष्यातला आनंद,
गणेशाच्या पोटा इतका विशाल असो,
अडचणी उंदरा इतक्या लहान असो,
आयुष्य सोंडे इतके लांब असो,
क्षण मोदका इतके असो..


--सचिन वर्दे
------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-लाईफ हॅकर मराठी.कॉम)
                  -------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-04.02.2022-शुक्रवार.