II माघी गणेश जयंती II-शुभेच्छा क्रमांक-7

Started by Atul Kaviraje, February 04, 2022, 12:20:15 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     II माघी गणेश जयंती II
                                         शुभेच्छा क्रमांक-7
                                   ------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

       आज शुक्रवार,०४ फेब्रुवारी ,२०२२ . माघ शुद्ध चतुर्थी अर्थात माघ महिन्यातील श्रीगणेश जयंती. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवयित्रींना, या माघी गणेश जयंतीच्या मनापासून शुभेच्छा. त्या बाप्पाला नमन करून वाचूया, माघी गणेश जयंतीवर लेख, माहिती, पूजा विधी, कथा, शुभेच्छा, कविता आणि बरंच काही.

बाप्पा
सगळ्यांच्या आयुष्यात सुख दे ,
त्यांचे जे काही problems असतील
त्यात त्यांना सामोर जाण्याची शक्ती दे ,
जे होणार असतं ते होतच
पण हा virus लवकर जाऊ दे
अशी आम्ही सगळे प्रार्थना करतो ,
त्यांची जी काही परिस्थिती आहे
त्यात त्यांना आनंदी राहण्याची बुद्धी दे
आणि त्यांना त्यांच्या स्वप्नांपर्यंत पोहोचवण्याचा मार्ग दाखव ...
तुमच्याकडे काय मागायचं बाप्पा ,
तुम्हाला तर सगळंच माहीत असतं ,
आणि तुम्ही ते न सांगता पण देता,
फक्त आम्ही माणसं तस नाही वागत
जस तूम्ही शिकवल आहे
नेहेमी सगळ्यांच्या आदर करणे ,
सगळ्यांसोबत चांगल वागणं आणि बरच काही ...
🙏🙏🙏🙏गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🙏🙏

"बाप्पा, माझ्या जिवाभावाच्या माणसांना उदंड आयुष्य दे..
तुझे लक्ष त्यांच्यावर आयुष्यभर असेच राहू दे..
त्या सर्वाना सुखात, आनंदात आणि समाधानात ठेव..
हीच तुझ्या चरणी प्रार्थना"
गणपती बाप्पा मोरया!
पुढच्या वर्षी लवकर या!!
हार्दिक शुभेच्छा!

डोळ्यात आले अश्रू,
बाप्पा आम्हाला नका विसरू..
आनंदमय करून चालले तुम्ही,
पुढल्या वर्षाची वाट पाहू आम्ही..
हार्दिक शुभेच्छा!


--सचिन वर्दे
------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-लाईफ हॅकर मराठी.कॉम)
                 --------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-04.02.2022-शुक्रवार.