राजकारण चारोळ्या-"विनाशाचीच चाहूल आजलागतेय,सुसंस्कृत मनुष्याकडून अशी कृती घडतेय"

Started by Atul Kaviraje, February 05, 2022, 01:25:46 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

 विषय : सातारा  येथे , प्रतिस्पर्धी कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादी कार्यालयावर दगड -फेक .
                    वास्तव -राजकारण  विघातक  वळण  चारोळ्या
     "विनाशाचीच चाहूल आज लागतेय,सुसंस्कृत मनुष्याकडून अशी कृती घडतेय"
-------------------------------------------------------------------------


(1)
पटले  नाही  म्हणून  का  हे  अविचारी  कृत्य  व्हावे  ?
प्रत्यक्ष  सातारा  शहरी , हे  असे  वावगे  आचरण  घडावे  ?
कारण  काहीही  असो , "सुसंस्कृत  माणसाच्या"  हातून  हे  असं  का  होतंय  ?
अशा  घातकी ,हिंसक  मार्गाचा  तो  अवलंब  का  करतोय  ?

(2)
प्रतिस्पर्धी  कार्यकर्ते  करिती  "दगड -फेक" , प्रतिस्पर्ध्यांच्या  कार्यालयावरती
वावगे  घडतंय  हातून , कुंठितच , कोतीच  झालीय  त्यांची  मती
निषेध  दर्शविण्याचा  हा  नव्हे  मार्ग , सर्वथा  योग्य ,
विनाशकाले  विपरीत  बुद्धी , हातून  वर्तन  घडतंय  त्यांच्या  अयोग्य .

(3)
इतरही  अनेक  आहेत  मार्ग , निषेध  दर्शविण्याची
कृपया , थांबवा  कार्यकर्त्यांनो  तुमचे  हे  अघोरी -कृत्य  "दगड -फेकीचे"
अरे , कुणा  होईल  इजा , प्राणही  जाण्याची  आहे  शक्यता ,
तुमची  विवेक -बुद्धी , सारासार  विचार  याचसाठी  तुम्ही  का  वापरता  ?

(4)
असे  अनेक  "दगड -फेकीचे"  प्रकार  घडत  होते ,आजही  घडताहेत
बुद्धी  जोवर  टाकलीय  गहाण , तोवर  असे  राहिलंच  घडत
मानवा  तुला  देवाने  दिलीय  बुद्धी, विवेक ,मती ,विचार -शक्ती ,
तुझा  आंधळा  राग  आवर , डोळसपणाने  कार्य  कर  प्रत्यक्षात .

(5)
एकाने  "दगड"  मारला  की  दुसराही  त्याचे  अनुकरण  करतो
त्याच्या  या  कृतीत  पुढचा -मागचा  कोणताही  विचार  नसतो
याचा  परिणाम  अंती  वाईटच  होतो , हे  मानवास  नाही   कळत ,
काहीतरी  घडले  की  मग , बसावे  लागते  त्याला  पश्चात्ताप  करीत , हळहळत .

(6)
यापुढे  हात ("दगड") उगारण्यापूर्वी , शंभरदा  व्हावा  विचार
जमावाला  नसतात  डोळे , हरवलेला  असतो  विवेकच  सारासार
दक्षता  घ्यावी  यापुढे , घडू  नये  असा  अनुचित  प्रकार ,
एकत्र  राहायचंय  साऱ्यांनाच  येथे , तडजोड  करून , देऊन  एकमेकांना  आधार .


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-05.02.2022-शनिवार.