अनोखे आंदोलन-चारोळ्या-"शाळेचे दिवस आलेत परतुनी,घर भिजवलंय कार्यकर्त्यांनी शाईनी"

Started by Atul Kaviraje, February 07, 2022, 01:47:59 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

विषय : मुंबई  येथे  जनशक्ती  कार्यकर्त्यांनी , ST कर्मचारी  आंदोलनाच्या  पार्श्वभूमीवर , नेत्यांच्या  घरावर   काळी  शाई  फेकीत  आंदोलन  केले .
            ST कर्मचारी  पाठिंबा - कार्यकर्ते  अनोखे आंदोलन-चारोळ्या
          "शाळेचे दिवस आलेत परतुनी,घर भिजवलंय कार्यकर्त्यांनी शाईनी"
--------------------------------------------------------------------------


(1)
भलतीकडेच  घेतंय  वळण  हे  ST कर्मचाऱ्यांचे  सरकार -विरोधी  आंदोलन
आता  ते  नाही  राहिलंय  फक्त  त्यांचेच , भरतय  कार्यकर्त्यांनी  अख्ख  दालन
पाठिंबा  देण्या  ST कर्मचाऱ्यांना , ते  "फेकीती  शाई"  घरांवर  नेत्यांच्या ,
वाटतंय दिवस आलेत फिरुनी , त्या  मस्तीखोर  मुलंI -मुलींच्या  खोड्यायुक्त  शाळेच्या .

(2)
काय  चाललंय  हे , मोठ्यांना  आता  हे  शोभतच  नाही
आंदोलन  राहिलंय  बाजूलाच , नवा  वाद  नव्याने  सुरु  होई
सरकार , नेते  जोवर  ST कर्मचाऱ्यांच्या  मागण्या  मान्य  करीत  नाहीत ,
पाठिंबा  कार्यकर्ते  म्हणती , तोवर आम्ही  "फेकीत"  राहू  त्यांच्या  घरावरती  "शाई"  ?

(3)
कुठलाही  संबंध , कुठेही  जोडताहेत , बादरायणच  आहे  जणू
आम्हाला  फक्त  घरचं  रंगवायचेय  "शाईनी" , असे  ते  लागलेत  म्हणू
जनशक्ती  कार्यकर्ते  दाखवून  देताहेत , आपली  महाशक्ती  जनांसाठीची ,
पण  हा  बालिश  मार्ग  नव्हे , अनेक  आहेत  योग्य  दिशा , सुवर्ण -मध्याची .

(4)
आता  तो  दिवस  दूर  नाही , ST कर्मचाऱ्यांच्या  बाजूने  लागेल  निकाल
बोलणी  चाललीत  सरकारची  कोर्टात  न्यायाधिशांसह  संध्याकाळ  अन  सकाळ
नक्कीच  न्याय  मिळेल  त्यांना , हक्क  होतील  प्राप्त , लवकरच  निःसंशय ,
कार्यकर्त्यांनी  थांबवावे  कृपया  काळी  "शाई  फेक" , आवरावा  त्यांनी  व्यय .

(5)
असा  राग  काढून  नेत्यांवर , कार्यकर्ते  करताहेत  फार  घाई
अविचारी  त्यांचे  हे  कृत्य , रागावर  त्यांचे  नियंत्रण  का  नाही  ?
STATIONARY दुकानांना  मात्र  आलीय  बरकत , विकून  त्यांना  भरमसाट  "शाई" ,
कंटाळले  होते  ते  विकून  सारखे -सारखे , पुस्तके  अन  वही  !

(6)
कार्यकर्त्यांनो , यापेक्षा  काहीतरी  अभिनव  उपक्रम  राबवा  विद्यार्थ्यांसाठी
शाळा  होतील  लवकरच  सुरु , पाहावे  हीत  विद्यार्थ्यांचे , काहीतरी  करा  त्यांच्यासाठी
गरिबांना  पुस्तके ,वह्या ,पेन ,पेन्सिल वाटून  शिक्षणास  मदत  करा ,
ही  "शाई  फेकाफेक"  बंद  करा , निरक्षरांना  लेखणी  धरून  साक्षर  करा  !


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.02.2022-सोमवार.