मार्मिक चारोळ्या-"कासाराला चांगले दिवस आलेत,सरकारलाही बांगड्यांचे महत्त्व कळलंय?

Started by Atul Kaviraje, February 09, 2022, 01:31:31 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

              विषय :स्त्रियांकडून  सरकारला  बांगड्यांचा  आहेर
                    वास्तव  राजकारणी  मार्मिक  चारोळ्या
   "कासाराला चांगले दिवस आलेत,सरकारलाही बांगड्यांचे महत्त्व कळलंय?"
  -----------------------------------------------------------------


(1)
मागण्या  मान्य  होत  नाहीत  "स्त्रियांच्या"
आंदोलन  हेच  एक  अस्त्र  आहे  त्यांचे
म्हणून  का  असा  अविचार  व्हावा  ?
"सरकारला"  चक्क  त्यांनी  "बांगड्यांचा  आहेर"  पाठवावा  ?

(2)
कार्य  साधत  नाही , याचा  अर्थ  असा  नाही
"सरकारला"  त्यांच्या  मागण्या  कळतं  नाहीत
काही  चांगल्या  गोष्टींना  लागतोय  वेळ ,
पण  इथे  चाललाय  फक्त  अंध , अविचारी  खेळ !

(3)
"सरकारला"  मिळालाय  "आहेर  बांगड्यांचा  स्त्रियांकडून"
मीडिया  छापतेय  बातमी  सर्व  वर्तमानपत्रांतून
मीडियाला  काय , खप  होण्या  रोज  बातमी  लागतेय  नवी ,
सुसूत्रता  नसते  त्यांच्या  बातमीत , छापती  काही -बाही .

(4)
अधिकार  आहे  बोलण्याचाही  "स्त्रियांना" , आहे  मान्य
परि , अविचारी  वर्तणूक  त्यांचीच  करतेय  मती  शून्य
"स्त्रियांनो" , "बांगड्या"  तुमच्याकडेच  ठेवा , तुम्हालाच  शोभतोय  हा  अलंकार ,
"सरकारला"  त्याचे  काम  करू  द्या , विवेक -बुद्धी  अवलंबा  तुम्ही  सारासार  !

(5)
१३५  कोटी  जनतेला , सांभाळणे  फारच  असते  कठीण
कंबरडेच  मोडून  जातंय  "सरकारचे" , होतंय  ते  दीन
थोडं  समजून  घ्या  "स्त्रियांनो" , थोडा  वाव  द्या  त्यांना ,
राहू  दे  तुमच्याच  हातात , तुमच्याच  "बांगड्याना" .


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-09.02.2022-बुधवार.