"०९-फेब्रुवारी –दिनविशेष"

Started by Atul Kaviraje, February 09, 2022, 11:27:28 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०९.०२.२०२२-बुधवार.जाणून घेऊया, आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"


                                     "०९-फेब्रुवारी –दिनविशेष"
                                    -------------------------


अ) ०९ फेब्रुवारी रोजी झालेल्या घटना.
   ------------------------------

१९००: लॉन टेनिस या खेळातील डेव्हिस कप या करंडकाची सुरूवात झाली.

१९३३: साने गुरुजी यांनी नाशिकच्या कारागृहात असताना श्यामची आई या पुस्तकाच्या लेखनाला सुरुवात केली.

१९५१: स्वतंत्र भारताची पहिली जनगणना सुरू.

१९६९: बोइंग-७४७ विमानाचे पहिले चाचणी उड्डाण झाले.

१९७३: बिजू पटनायक ओरिसा विधानसभेचे विरोधी पक्षनेते बनले.

२००३: संगीतकार रवींद्र जैन यांना मध्यप्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार प्रदान.

=========================================

ब) ०९ फेब्रुवारी रोजी झालेले जन्म.
   ---------------------------

१४०४: शेवटचा बायझेंटाईन सम्राट कॉन्स्टन्टाईन (अकरावा) यांचा जन्म.

१७७३: अमेरिकेचे ९वे अध्यक्ष विल्यम हेन्री हॅरिसन यांचा जन्म. (मृत्यू: ४ एप्रिल १८४१)

१८७४: स्वातंत्र्यशाहीर गोविंद त्र्यंबक दरेकर उर्फ कवी गोविंद यांचा जन्म. (मृत्यू: २८ फेब्रुवारी १९२६ – नाशिक)

१९१७: गांधीवादी नेते, सिक्‍कीमचे पहिले राज्यपाल, मंत्री व आमदार होमी जे. एच. तल्यारखान यांचा जन्म. (मृत्यू: २७ जून १९९८)

१९२२: इंग्लिश क्रिकेट खेळाडू जिम लेकर यांचा जन्म. (मृत्यू: २३ एप्रिल १९८६)

१९२२: भारतीय उद्योगपती लीला पॅलेस हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स चे संस्थापक सी. पी. कृष्णन नायर यांचा जन्म. (मृत्यू: १७ मे २०१४)

१९२९: महाराष्ट्रचे ८वे मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांचा जन्म. (मृत्यू: २ डिसेंबर २०१४)

१९७०: ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा यांचा जन्म.

=========================================

क) ०९ फेब्रुवारी रोजी झालेले मृत्यू.
   ----------------------------

१८७१: रशियन कादंबरीकार आणि तत्त्वज्ञ फ्योदोर दोस्तोवस्की यांचे निधन. (जन्म: ११ नोव्हेंबर १८२१)

१९६६: बालमोहन नाटक मंडळीचे संस्थापक दामूअण्णा जोशी यांचे निधन.

१९७९: चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते राजा परांजपे यांचे निधन. (जन्म: २४ एप्रिल १९१०)

१९८१: न्यायाधीश, मुत्सद्दी आणि केंद्रीय मंत्री एम. सी. छागला यांचे निधन. (जन्म: ३० सप्टेंबर १९००)

१९८४: भरतनाट्यम नर्तिका तंजोर बालसरस्वती यांचे निधन. (जन्म: १३ मे १९१८)

२०००: चित्रपट अभिनेत्री व निर्माती शोभना समर्थ यांचे निधन.

२००१: माजी हवाई दल प्रमुख, एर चीफ मार्शल दिलबागसिंग यांचे निधन.

२००८: कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वाहून घेणारे थोर समाजसेवक डॉ. मुरलीधर देविदास ऊर्फ बाबा आमटे यांचे निधन. (जन्म: २६ डिसेंबर १९१४)

=========================================


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-09.02.2022-बुधवार.