मार्मिक कोरोना चारोळ्या-"लसीकरण करा,दोन्ही डोस घ्या,अन्यथा रेशनसाठी वंचित रहा"

Started by Atul Kaviraje, February 12, 2022, 01:36:57 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

  विषय :गावात  लशीकरण  झालेल्यानाच  रेशन  आणि  सातबाराचा  उतारा  मिळणार
                         मार्मिक  वास्तव  कोरोना  चारोळ्या
           "लसीकरण करा,दोन्ही डोस घ्या,अन्यथा रेशनसाठी वंचित रहा"
-------------------------------------------------------------------------


(1)
काय  अजब  कायदा  काढलाय  सरकारने  कोरोनात
मुकाट  घ्या  लस , गुपचूप  करा  "लशीकरण"
जर , "लशीकरण"  करण्यास  तुम्ही  चुकIलं ,
तर  "रेशनास"  आणि  "सातबाऱ्यास"  मुकाल  ?

(2)
अरे , काय  संबंध  "लसीकरणाचा"  आणि  "रेशन -सातबाऱ्याचा"  ?
गावागावांत  दवंडी  पिटतेय  या  गजब  निर्णयाची
जर  एखादा  राहिला  नजरचुकीने  "लशीकरण"  करण्या ,
तर  त्याच्यावर  येईल  का  वेळ  उपासमारीची  ?

(3)
जमिनीचा  हक्क  मिळणार  नाही , "सातबारा"  उतारा  मिळणार  नाही  !
तलाठी  ओरडला  गावकऱ्यांच्या  अंगावर , वसकन  फिसकारला   
दोन्ही  लशींचे  प्रमाण -पत्र  ठेवा  आधी  टेबलावर ,
नंतरच  "सातबारा"  मिळेल , जमीन  होईल  तुमच्या  नावावर  !

(4)
कधी -कधी  दुर्गम  भागांत  लशी  पोचत  नाहीत  वेळेवर
काही -काही  गावे  तर  अजुनी आहेत  वंचित  लशींसाठी
म्हणून  का  त्यांनी  त्यांची  जमीन  कसणे  बंद  करावे  ?
आणि  झोपावे  रात्री  चक्क  उपाशीपोटी  ?

(5)
हे  जगावेगळे  नियम  सरकारने  ताबडतोब  रद्द  करावे
गावकऱ्यांच्या  कलेने , त्यांचा  विचार  करून  कार्य  सांभाळावे
गरिबीचे  जीवन  त्यांचे , त्यांच्यावर  जबरदस्ती  करणे  सोडावे ,
या  नियमांचे  कागद  जाळून , ग्रामस्थांचे  "लशीकरण"  व्हावे  !


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-12.02.2022-शनिवार.