बालभारती - आठवणीतील कविता

Started by MK ADMIN, February 15, 2009, 08:21:32 PM

Previous topic - Next topic

संजय मोरडे

विटी दांडूचा खेळ मजेदार
ही कविता हवी आहे plz कोणाकडे असेल तर पाठवा
9867574586 whatapp kara

नवनाथ ज्ञानोबा पुरी

दिले सोडून दिप जे बालीकांनी l दिलासारखा वेग सर्वां तयानी I तयाची स्थिती त क्षणी भिन्न झालीI कुणी जात वरती कुणी जाय खाली 1कुणी गुंतून राहिले भोवऱ्यात |जलौघा सवे जात कोणी व हात 1 प्रवाहात सोडलेल्या दिव्याची स्थिती रुपक जुनी 1965 पाचवी ची मराठी कविता मिळेल का ?

sushama

i know only first line  "  unch pati palathi ushakhali hat donhi te adwe kapali  "anybody knows this kavita ?

Chaitanya deshpande

तेथील एक कलहंस तटी निजेला
जो भागला जलविहार विशेष केला
पोटीच एक पद लांबविला दुजा तो
पक्षी तनु लपवी भूप तया पहातो ।

टाकी उपानह पदे अतिमंद ठेवी
केली विजार वारी  डौरही मौन सेवी
हस्ती करी वलय उंच अशा उपायी
भूपे हळूच धरिला कलहंस पायी ।

कलकल कलहंसे फार केला सुटाया
फडफड निजपक्षी दविली ही उडाया
नृपतीस मानिबंधी टोचिता होय चंचू
धरील दृढ जया त्या काय सोडील पंचू ।

तदीतर खग भेणे वेगळाले पळाले
उपवन जल केली जे कराया मिळाले
स्वजन गवसला जो याजपासी वसे तो
कठीण समय येता कोण कामास येतो ।।

न सोडी हा नळ भूमिपाळ माते
असे जाणोनि हंस वदे याते
हंसहिंसका धन्य तुझ्या हाते
स्वस्थळाते पावेन पक्षपातें ।

पदोपदी आहेत वीर कोटी भले झुंझार शक्ती जया मोठी
तया माराया धैर्य धरी पोटी पाखिरु हे मारणे बुद्धी खोटी ।

येणे परी परिसता अति दीन वाचा हेलावला नळ पयोधी दयारसाचा
सोडी वदे विहर जा अथवा फिराया राहे यथानिज मनोरथ हंसराया ।।

Poornima kore

बाप

चित्रकार : श्री. श्रीमंत होनराव, वाईशेतामधी माझी खोप
तिला बोराटीची झाप
तिथं राबतो, कष्टतो
माझा शेतकरी बाप

लेतो अंगावर चिंध्या
खातो मिरची भाकर
काढी उसाची पाचट
जगा मिळाया साखर
काटा त्याच्याच का पायी
त्यानं काय केलं पाप ?

माझा बाप शेतकरी
उभ्या जगाचा पोशिंदा
त्याच्या भाळी लिहिलेला
रातदिस कामधंदा
कष्ट सारे त्याच्या हाती
दुसऱ्याच्या हाती माप

बाप फोडतो लाकडं
माय पेटविते चुल्हा
पिठामागल्या घामाची
काय चव सांगू तुला
आम्ही कष्टाचंच खातो
जग करी हापाहाप !


— इंद्रजीत भालेराव

माझ सर्वात आवडत

विलास वैद्य

धन्यवाद , मी हि कविता बरेच दिवस शोधत होतो !
वाचून खूप छान वाटले !

Vilas Vaidya

घन्यवाद , मी ही कठिण समय येतां कोण कामास येतो ही कविता बरेच दिवस शोधत होतो , वाचून खूपच छान वाटले !

Sadashiv Gopal Raut


Yash Katkar

   सलाम माझा त्या
  विर जवानांना ज्यांनी
   सांडले होते रक्त
      कारण
  तेच खरे देशभक्त
ज्यांनी चालवले
       शिवरायांचे अस्त्र
तेच विर्मातेच्या
       पोटी जन्मलेले
जिजाऊंचे पुत्र

Yash Katkar

   सलाम माझा त्या
  विर जवानांना ज्यांनी
   सांडले होते रक्त
      कारण
  तेच खरे देशभक्त
ज्यांनी चालवले
       शिवरायांचे अस्त्र
तेच विर्मातेच्या
       पोटी जन्मलेले
जिजाऊंचे पुत्र