II व्हॅलेन्टाईन्स डे-प्रेम दिवस II-लेख क्रमांक-१

Started by Atul Kaviraje, February 13, 2022, 03:06:41 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 II व्हॅलेन्टाईन्स डे-प्रेम दिवस II
                                          लेख क्रमांक-१
                               ------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     उद्या  दिनांक-१४ फेब्रुवारी, २०२२ - सोमवार आहे. उद्याचा दिवस, "व्हॅलेन्टाईन्स डे हा प्रेम दिवस म्हणून १४ फेब्रुवारी रोजी जगभर साजरा केला जातो. हा एक ख्रिश्चन सण सुद्धा आहे. हा दरवर्षी १४ फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी लोक आपल्या आवडत्या व्यक्तीला शुभेच्छा संदेश, फुले किंवा चॉकलेट पाठवून प्रेम व्यक्त करतात." तेव्हा चला तर वाचूया, प्रेम-दिना निमित्त लेख, यामागचा इतिहास, कथा, शुभेच्छा संदेश, प्रेम-चारोळ्या, प्रेम-मेसेज इत्यादी.

     प्रेमाचा उत्सव मानला जाणारा व्हॅलेंटाइन डे आज उत्साहात साजरा केला जात आहे. महाविद्यालयातील युवकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा असतो. युवक-युवती आपापल्या जोडीदाराचा शोध या दिवशी घेत असतात. प्रेम सागरात जोडीदार यथेच्छ सैर करत असतात. व्हॅलेंटाइन डे का साजरा केला जातो, तो केव्हापासून साजरा करण्याची प्रथा सुरू झाली, जाणून घेऊया...

                 व्हॅलेंटाइन डेः 'या' संताने दिला प्रेमाचा संदेश---

     प्रेमाचा उत्सव मानला जाणारा व्हॅलेंटाइन डे आज उत्साहात साजरा केला जात आहे. महाविद्यालयातील युवकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा असतो. युवक-युवती आपापल्या जोडीदाराचा शोध या दिवशी घेत असतात. प्रेम सागरात जोडीदार यथेच्छ सैर करत असतात. अनेकांना हा दिवस का साजरा केला जातो, याची माहिती नसते. तर अनेक जण हा दिवस साजरा करणे म्हणजे पाश्चात्यांचे अंधानुकरण करणे आहे, असे मानतात. व्हॅलेंटाइन डे का साजरा केला जातो, तो केव्हापासून साजरा करण्याची प्रथा सुरू झाली, जाणून घेऊया...

                  ​प्रेमात कोणतीही अट नसते---

      प्रत्येक युगुल आपापल्या पद्धतीप्रमाणे व्हॅलेंटाइन डे साजरा करत असतो. विवाह झाला असो, अविवाहित असो, नवीन रिलेशनशिप असो वा जोडीदाराचा शोध घ्यायचा असो, व्हॅलेंटाइन डेची आतुरतेने वाट पाहिली जाते. या दिवशी जोडीदार एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले असतात. प्रेम ही अनुभवण्याची गोष्ट असते. प्रेमाला मर्यादा नसतात, बंधने नसतात, प्रेमात कोणतीही अट नसते.

                ​रोमन साम्राज्य व क्लाऊडियस राजा---

     व्हॅलेंटाइन डे साजरा करण्याविषयी नेमकी माहिती उपलब्ध नाही. तरीही या दिवसामागे एक रंजक कथा आहे. इ.स. २७० मध्ये रोमन साम्राजाचा क्लाऊडियस गोथिकस द्वितीय नामक राजा होता. त्याला प्रेम, विवाह या गोष्टींचा तिटकारा होता. प्रेम, विवाह याला तो जोरदार विरोध करायचा. प्रेम आणि विवाह यामुळे सैनिक आपले लक्ष्य विसरतात, अशी त्याची ठाम समजूत होती.

              ​राजाचे प्रजेला सक्त आदेश---

     राजा क्लाऊडियस गोथिकस द्वितीय याने आपल्या साम्राज्यात एक फतवा काढला. त्यानुसार, कोणताही सैनिक प्रेमात पडणार नाही किंवा विवाह करणार नाही. विवाह न केल्यामुळे सैनिकांचे मनोबल आणि ताकद उंचावते, अशी राजाची धारणा होती.

                    ​संत व्हॅलेंटाइन यांचा विरोध---

     राजा क्लाऊडियस गोथिकस द्वितीय याने दिलेल्या आदेशाला संत व्हॅलेंटाइन यांनी तीव्र विरोध दर्शवला. रोमन साम्राज्याला त्यांनी प्रेमाचा संदेश दिला. राजाविरोधात जाऊन सैनिकांना प्रेम करण्याची प्रेरणा दिली. इतकेच नव्हे, तर काही सैनिकांचे विवाह करून दिले. राजाला ही गोष्ट समजताच संत व्हॅलेंटाइन यांना मारण्याचे फर्मान राजाने काढले.
                 
                     ​१४ फेब्रुवारी - व्हेलेंटाइन दिन---

     संत व्हॅलेंटाइन यांना ज्या दिवशी मारण्यात आले, तो दिवस होता १४ फेब्रुवारी. संत व्हॅलेंटाइन यांनी मृत्युपूर्वी जेलर याच्या आंधळ्या मुलीला बरे केल्याची दंतकथा आहे. जेलमध्ये असताना संताने जेलरच्या मुलीला पत्र लिहिले होते. त्या शेवटी 'फ्रॉम युअर व्हॅलेंटाइन' असे लिहिल्याचे सांगितले जाते.

                           व्हॅलेंटाइन डे घोषित---

     उपलब्ध माहितीनुसार, इ.स. ४९६ मध्ये पहिल्यांदा व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यात आला. सुरुवातीला हा दिवस रोमन फेस्टिव्हल म्हणून साजरा करण्यात येत असे, अशी मान्यता आहे. पोप गॅलेसियस यांनी १४ फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाइन डे म्हणून घोषित केल्याचे समजते. तेव्हापासून १४ फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाइन डे साजरा करण्याची प्रथा सुरू झाली.

                 संत व्हॅलेंटाइनबद्दल पुस्तकात माहिती---

     सन १२६० मध्ये संकलित केलेल्या 'ऑरिया ऑफ जॅकोबस डी वॉराजिन' या पुस्तकात संत व्हॅलेंटाइन यांच्या बद्दल माहिती मिळते. या संताने प्रेमाचा संदेश समाजाला दिला आणि आनंदी राहण्याचा गुरुमंत्र दिल्याची माहिती या पुस्तकातून देण्यात आली आहे. अनेक ख्रिश्चन हुतात्म्यांची नावे व्हॅलेंटाइन असल्याचा उल्लेखही आढळतो. १९६९ मध्ये औपचारिकरित्या ११ दिवसांचा व्हॅलेंटाइन डे साजरा करण्याला चर्चनी मान्यता दिल्याचे समजते. ख्रिश्चन धर्मातील सर्व संतांच्या सन्मानार्थ १४ फेब्रुवारी व्हॅलेंटाइन डे म्हणून साजरा केला जातो.


--देवेश फडके
--------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
                   ---------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-13.02.2022-रविवार.