II व्हॅलेन्टाईन्स डे-प्रेम दिवस II-शुभेच्छा क्रमांक-1

Started by Atul Kaviraje, February 13, 2022, 03:14:11 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    II व्हॅलेन्टाईन्स डे-प्रेम दिवस II
                                            शुभेच्छा क्रमांक-1
                                  ------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     उद्या दिनांक-१४ फेब्रुवारी, २०२२ - सोमवार आहे. उद्याचा दिवस, "व्हॅलेन्टाईन्स डे हा प्रेम दिवस म्हणून १४ फेब्रुवारी रोजी जगभर साजरा केला जातो. हा एक ख्रिश्चन सण सुद्धा आहे. हा दरवर्षी १४ फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी लोक आपल्या आवडत्या व्यक्तीला शुभेच्छा संदेश, फुले किंवा चॉकलेट पाठवून प्रेम व्यक्त करतात." तेव्हा चला तर वाचूया, प्रेम-दिना निमित्त लेख, यामागचा इतिहास, कथा, शुभेच्छा संदेश, प्रेम-चारोळ्या, प्रेम-मेसेज इत्यादी.

                    व्हॅलेंटाईन डे शुभेच्छा---

      जगभरात दरवर्षी साजरा केला जाणारा व्हॅलेंटाईन वीक आता भारतातही साजरा केला जाऊ लागला आहे. व्हॅलेंटाईन डे ला मराठी भाषेत प्रेम दिवस म्हटले जाते. हा प्रेम दिवस दरवर्षी 14 फेब्रुवारी ला साजरा केला जातो. आजच्या या लेखात आपण Valentine day quotes for husband in Marathi पाहणार आहोत या मध्ये husband व wife दोघांसाठी Valentine day msg मराठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

या व्हॅलेंटाईन डे ला मला गिफ्ट मध्ये
तू आणि तुझा वेळ हवा आहे.
जो फक्त माझ्यासाठी असेल.
हॅपी व्हॅलेंटाईन डे.

जेव्हा तू सोबत असतोस,
तेव्हा वाटते की वेळ थांबून जावास
Happy valentines day dear

प्रेम या दोन अक्षरातच जीवनाचा खरा अर्थ दडला आहे
या अर्थाच्या शोधातच एक जीव दुसऱ्यावर जडला आहे..!
Happy Valentines Day My Love..!

तुझ्यावर रुसणं, रागावणं
मला कधी जमलच नाही.
कारण तुझ्याशिवाय माझं मन
दुसऱ्या कुणात कधी रमले नाही..!
तुझ्या प्रेमाचा रंग तो,
अजूनही बहरत आहे
शेवटच्या क्षणापर्यंत
मी फक्त तुझीच आहे.

मला सात जन्माच वचन नकोय तुझ्याकडून,
ह्याच जन्मात तू हवा आहेस
आणि ते पण शेवटच्या श्वासापर्यंत.

माझे हृदय जरी लहान असले तरी त्यात
तुमच्या साठी जागा खूप आहे.

हसणे तुझे ओठांवरचे गुलाबा परी फुलताना
सुटती कोडी आयुष्याची तुझ्या मिठीत असताना.


--AUTHOR UNKNOWN
-------------------------


                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-विशमराठी.कॉम)
                    ------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-13.02.2022-रविवार.