II व्हॅलेन्टाईन्स डे-प्रेम दिवस II-प्रेमाचे मेसेज क्रमांक-1

Started by Atul Kaviraje, February 13, 2022, 04:29:51 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   II व्हॅलेन्टाईन्स डे-प्रेम दिवस II
                                        प्रेमाचे मेसेज क्रमांक-1
                                 ------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     उद्या दिनांक-१४ फेब्रुवारी, २०२२ - सोमवार आहे. उद्याचा दिवस, "व्हॅलेन्टाईन्स डे हा प्रेम दिवस म्हणून १४ फेब्रुवारी रोजी जगभर साजरा केला जातो. हा एक ख्रिश्चन सण सुद्धा आहे. हा दरवर्षी १४ फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी लोक आपल्या आवडत्या व्यक्तीला शुभेच्छा संदेश, फुले किंवा चॉकलेट पाठवून प्रेम व्यक्त करतात." तेव्हा चला तर वाचूया, प्रेम-दिना निमित्त लेख, यामागचा इतिहास, कथा, शुभेच्छा संदेश, प्रेम-चारोळ्या, प्रेम-मेसेज इत्यादी.

                        'व्हॅलेंटाइन्स डे'-प्रेमाचे मेसेज---

     'व्हॅलेंटाइन्स डे'...आपल्या खास व्यक्तीकडे प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. फेब्रुवारी महिना सुरू होताच प्रेमी जोडपी या दिवसाची आतुरतेनं वाट पाहतात. हा दिवस संस्मरणीय करण्यासाठी प्रत्येक कपल काही-न्-काही जगावेगळा प्लान आखण्याचा प्रयत्न करतात. महागड्या भेटवस्तू, व्हॅलेंटाइन डेट (valentines day in marathi), डेस्टिनेशन डेट यांसारखे पर्याय तुमच्या डोक्यात असतीलच. पण प्रेम व्यक्त करण्यासाठी शब्दांचाही कधीतरी आधार घ्यावा. 'व्हॅलेंटाईन डे'ला आपल्या प्रियकर/ प्रेयसी (valentines day quotes for girlfriend and boyfriend in marathi), मित्र-मैत्रिण, पतीला प्रेमाचे मेसेज (valentines day quotes for husband in marathi), प्रेमाचे संदेश (valentines day messages in marathi) पाठवून त्यांच्या दिवसाची चांगली सुरुवात करायला विसरू नका.

     नातं जरी जुने झालं असलं तरी नात्यातील प्रेम काळानुसार अधिक वाढत जाते. कारण आयुष्यात कितीही सुखदुःख आली तरी  आपला जोडीदार आपली साथ सोडून कधीही जात नाही. याच जोडीदाराला 'व्हॅलेंटाइन्स डे'ला प्रेमाचे मेसेज (valentines day quotes in marathi) पाठवून 'तु माझ्यासाठी खूप स्पेशल आहेस' ही भावना व्यक्त करा.

1. पाऊस म्हटलं की मला आठवते
तुझ्या उरातली धडधड
माझ्या आधाराशिवाय झालेलं
तुला पाऊल टाकणं अवघड...
--हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे

– दिपाली नाफडे
----------------

2. तुझ्या प्रेमाचा रंग तो...
अजूनही बहरत आहे.
शेवटच्या क्षणापर्यंत....
मी फक्त तुझीच आहे !!!
--Happy Valentines Day !

3. भरभरून बोलायचं असतं तेव्हा
आणि माझं मौन ओळखायचं असतं तेव्हाही
जवळ फक्त तूच हवास...
सतत खळखळ हसणं
आणि छोट्याछोट्या गोष्टीवरचं रुसणं
ते समजून घ्यायलाही, जवळ फक्त तूच हवास...
शब्द माझे बोचणारे पण प्रेम मात्र दोनशे टक्के खरं
तरीही तुझी नकोशी असणारी कारणं ऐकूनही
जवळ फक्त तूच हवास...
मन कितीही अस्ताव्यस्त असो
ते एका क्षणात सावरायला
जवळ फक्त तूच हवास...
पण हे फक्त माझं म्हणणं,
तुझं विश्व वेगळंच,
मी मात्र तुला आपलं आपलं म्हणावं
आणि तू सहज तो बंध तोडून जावं
एक दिवस येईल असाही तू म्हणशील आज जवळ फक्त तूच राहावं
पण....
या पण मध्येही स्वतःला हरवून जिंकले असेन मी...
कारण फक्त एकच
जवळ फक्त तूच हवास...
--हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे

– दिपाली नाफडे
-----------------

4. असतोस तू जेव्हा
हसूही तरळे अलगद ओठांवरी
पाहत राहावे तुला आणि तुलाच उमगावे मी
लाडे लाडे तुला छळावे
सर्व लाड पुरवून घ्यावे
कोणास ठाऊक पुन्हा असे दिवस कधी यावे
असतोस तू जेव्हा
मिठीत तुझ्या विसावे
क्षणाच्या सहवासात जन्माचे जगून घ्यावे
खांद्यावर डोके ठेवून कायमचे तुझे होऊन जावे
विरहाचे क्षण येता पुन्हा अलगद आसवांनी तुझे व्हावे
डोळ्यांनी तुला सांगावे
असतोस तू जेव्हा
--हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे

– दिपाली नाफडे
-----------------

5. बंध जुळले असता,
मनाचं नातंही जुळायला हवं...
अगदी स्पर्शातूनही
सारं सारं कळायला हवं...
--हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे


                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                  ----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-13.02.2022-रविवार.