II व्हॅलेन्टाईन्स डे-प्रेम दिवस II-प्रेमाचे मेसेज क्रमांक-4

Started by Atul Kaviraje, February 13, 2022, 04:34:30 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  II व्हॅलेन्टाईन्स डे-प्रेम दिवस II
                                       प्रेमाचे मेसेज क्रमांक-4
                               -------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     उद्या दिनांक-१४ फेब्रुवारी, २०२२ - सोमवार आहे. उद्याचा दिवस, "व्हॅलेन्टाईन्स डे हा प्रेम दिवस म्हणून १४ फेब्रुवारी रोजी जगभर साजरा केला जातो. हा एक ख्रिश्चन सण सुद्धा आहे. हा दरवर्षी १४ फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी लोक आपल्या आवडत्या व्यक्तीला शुभेच्छा संदेश, फुले किंवा चॉकलेट पाठवून प्रेम व्यक्त करतात." तेव्हा चला तर वाचूया, प्रेम-दिना निमित्त लेख, यामागचा इतिहास, कथा, शुभेच्छा संदेश, प्रेम-चारोळ्या, प्रेम-मेसेज इत्यादी.

16. संगीत जुनच आहे
सूर नव्यानं जुळताहेत
मनही काहीसं जुनच
तेही नवी तार छेडताहेत
--हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे

17. कधी बोलावसं वाटलं तरी नक्की बोल
ऐकण्यासाठी मी असेल
प्रश्न असतील मनात तुझ्या तर
उत्तर देण्यासाठी मी असेल
--हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे 

18. कधी कधी रुसणं देखील आहे महत्त्वाचं
ज्यामुळे माहिती पडते की...
आपला रुसवा दूर करणारंही कोणी तरी आहे...
--Happy Valentines Day !

19. बंध जुळले  असता,
मनाचं नातंही जुळायला हवं
अगदी स्पर्शातूनही
सारं सारं कळायला हवं..
--हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे

20. हो येतो मला प्रचंड राग
तुझ्या सतत फोन करण्याचा
तुझ्या त्या सतत प्रश्न विचारण्याच्या
सवईमुळेही माझा संताप होतो
पण तू नको बदलूस
तू करत जा मला फोन,
विचारत जा विनाकारण मनात येणारे ते प्रश्न
कंटाळवाण्या दिवसातला हा माझा
विरंगुळा झालाय आता
नेहमी चिडणारा मी
तुझा फोन नाही आला तरी चिडतो


– शिवराज यादव
---------------


                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                 ---------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-13.02.2022-रविवार.