II व्हॅलेन्टाईन्स डे-प्रेम दिवस II- प्रेम-चारोळ्या क्रमांक-1

Started by Atul Kaviraje, February 13, 2022, 04:36:27 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   II व्हॅलेन्टाईन्स डे-प्रेम दिवस II
                                        प्रेम-चारोळ्या क्रमांक-1
                                 ------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     उद्या दिनांक-१४ फेब्रुवारी, २०२२ - सोमवार आहे. उद्याचा दिवस, "व्हॅलेन्टाईन्स डे हा प्रेम दिवस म्हणून १४ फेब्रुवारी रोजी जगभर साजरा केला जातो. हा एक ख्रिश्चन सण सुद्धा आहे. हा दरवर्षी १४ फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी लोक आपल्या आवडत्या व्यक्तीला शुभेच्छा संदेश, फुले किंवा चॉकलेट पाठवून प्रेम व्यक्त करतात." तेव्हा चला तर वाचूया, प्रेम-दिना निमित्त लेख, यामागचा इतिहास, कथा, शुभेच्छा संदेश, प्रेम-चारोळ्या, प्रेम-मेसेज इत्यादी.

     नवविवाहित दाम्पत्यासाठी लग्नानंतरचे दिवस खास आणि अतिशय नाजूक असतात. या दोघांना स्वतःच्या आयुष्यापलिकडे कुटुंबातील अन्य सदस्यांचाही विचार करावा लागतो. कुटुंबीयांचं मन राखताना नवविवाहित पती-पत्नीला एकमेकांसाठी पुरेसा वेळ देखील मिळत नाही. प्रेमाचा दिवस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्हॅलेटाइन डेलाही तुम्हाला स्वतःचा हक्काचा वेळ मिळाला नाही,तर एकमेकांना मेसेज पाठवून प्रेम व्यक्त करायला विसरू नका. व्हेलेंटाईनला प्रपोझ करण्याचा विचार करत असाल तर पाठवा हे खास प्रपोझ मेसेज---

1. केवढी असोशी, किती अनावर ओढ..
जाग्रणात मावत नाही आता वेड..
कारण तरी द्यायची किती लोकांना
ये पुन्हा लपू एखाद्या कवितेआड

– वैभव जोशी, कवी
-------------------

2. ये...लपेटून चांदणे घेऊ
तू कशाला दिलीस शाल मला?

– सुरेश भट, कवी
------------------

3. तास-तास एखाद्या व्यक्तीची वाट पाहणं यासारख्या यातना नाहीत.
पण कुणीतरी आपली वाटत पाहत आहे, या जाणिवेसारखं सुखही नाही.
या जाणिवेतूनच माणसं धावत्या गाड्या पकडतात

– व.पु. काळे, लेखक
--------------------

4. तुला तुझा ऐल
मला माझा पैल
दोघेही कोरडे
दोघेही सचैल
किनाऱ्यास पाहे
प्रवाह... थांबून..
द्वैतातून वाहे
अद्वैत लांबून..

– वैभव जोशी, कवी
-------------------

5. तुझ्या माझ्या प्रेमाला
तुझी माझी ओढ
थोडं तु पुढे ये
थोडं मला मागे ओढ...

– प्रदीप वाघमारे
---------------


                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                 -----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-13.02.2022-रविवार.