II व्हॅलेन्टाईन्स डे-प्रेम दिवस II-प्रेमाचे संदेश क्रमांक-1

Started by Atul Kaviraje, February 13, 2022, 04:39:40 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   II व्हॅलेन्टाईन्स डे-प्रेम दिवस II
                                        प्रेमाचे संदेश क्रमांक-1
                                 ------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     उद्या दिनांक-१४ फेब्रुवारी, २०२२ - सोमवार आहे. उद्याचा दिवस, "व्हॅलेन्टाईन्स डे हा प्रेम दिवस म्हणून १४ फेब्रुवारी रोजी जगभर साजरा केला जातो. हा एक ख्रिश्चन सण सुद्धा आहे. हा दरवर्षी १४ फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी लोक आपल्या आवडत्या व्यक्तीला शुभेच्छा संदेश, फुले किंवा चॉकलेट पाठवून प्रेम व्यक्त करतात." तेव्हा चला तर वाचूया, प्रेम-दिना निमित्त लेख, यामागचा इतिहास, कथा, शुभेच्छा संदेश, प्रेम-चारोळ्या, प्रेम-मेसेज इत्यादी.

                   व्हॅलेंटाइनसाठी प्रेमाचे संदेश---

     व्हेलॅटाइन्स डे केवळ जोडप्यांनीच साजरा करायचा असतो, असा काही नियम नाही. तुम्ही आपल्या मित्रमैत्रिणींसोबतही हा दिवस साजरा करू शकता.

1. सहवासात तुझ्या,
व्याख्या मैत्रिची छान समजली...
सांगती तू असता,
जगण्याची रीत जणू मज उमजली....
--Happy Valentines Day !

2. मनाच्या तारा जुळून आलेल्या
सहवासाचा एक मधुर राग छेडलेला
संगतीत तुझ्या फुललेले जीवन
तुझ्या-माझ्या मैत्रीचा वेल गगनाशी भिडलेला
--हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे

3. तुझ्या माझ्या अतुट मैत्रीचं रहस्य मी जाणलंय...
आता मात्र मनात, मी फक्त तुलाच ठाणलंय
--हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे

4. काळोखाच्या वाटेवर चालताना, हातामध्ये तुझाच हात...
धडपडत्या आयुष्याला सावरताना, आता फक्त तुझीच साथ..
--हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे

5. तुझी माझी सोबत, सहवासाचं एक वचन आहे...
उमलत्या मैत्रीच्या कवितेचं,
मनातलं उत्स्फूर्त असं वाचन आहे
--हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे


                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                  ---------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-13.02.2022-रविवार.