II व्हॅलेन्टाईन्स डे-प्रेम दिवस II-प्रेमाचे संदेश क्रमांक-3

Started by Atul Kaviraje, February 13, 2022, 04:42:39 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    II व्हॅलेन्टाईन्स डे-प्रेम दिवस II
                                         प्रेमाचे संदेश क्रमांक-3
                                  -------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     उद्या दिनांक-१४ फेब्रुवारी, २०२२ - सोमवार आहे. उद्याचा दिवस, "व्हॅलेन्टाईन्स डे हा प्रेम दिवस म्हणून १४ फेब्रुवारी रोजी जगभर साजरा केला जातो. हा एक ख्रिश्चन सण सुद्धा आहे. हा दरवर्षी १४ फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी लोक आपल्या आवडत्या व्यक्तीला शुभेच्छा संदेश, फुले किंवा चॉकलेट पाठवून प्रेम व्यक्त करतात." तेव्हा चला तर वाचूया, प्रेम-दिना निमित्त लेख, यामागचा इतिहास, कथा, शुभेच्छा संदेश, प्रेम-चारोळ्या, प्रेम-मेसेज इत्यादी.

     व्हॉट्स अ‍ॅपमध्ये 'स्टेटस फीचर' अपडेट झाल्यापासून प्रत्येकाला स्वतंत्र मेसेज पाठवण्याचं प्रमाण कमी झालं आहे. हल्ली स्टेटसमध्येच एखाद्या 'स्पेशल डे'च्या किंवा सणाच्या शुभेच्छा दिल्या जातात.

1. एक थेंब अळवावरचा,
मोत्याचं रुप घेऊन मिरवतो
एक थेंब तुझ्या ओठांवरचा
माझं जग मोत्यांनी सजवतो
--Happy Valentines Day !

2. रात्री आकाश ओसंडुन
गेले होते तार्‍यांनी,
मी तुला शोधत उभा तर
वेड्यात काढले मला सार्‍यांनी!
--हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे

3. माझे सोन्याचे आभाळ,
माझी सोनेरी संध्याकाळ...
सये माझ्या गळ्यातली
सोनियाची तु माळ...
--हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे

4. कधी सांजवेळी
मला आठवूनी
तुझ्या भोवताली
जराशी वळूनी
पाहशील का???
--हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे

5. आता राहवेन मुळीच
कसे सांगू हे तुला?
दाटून येते आभाळ सारे
दे सोबतीा हात मला
--Happy Valentines Day !


                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                 -----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-13.02.2022-रविवार.