II व्हॅलेन्टाईन्स डे-प्रेम दिवस II-व्हॅलेंटाईन डे प्रेम कविता

Started by Atul Kaviraje, February 13, 2022, 06:01:26 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  II व्हॅलेन्टाईन्स डे-प्रेम दिवस II
                                      व्हॅलेंटाईन डे प्रेम कविता
                                ------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     उद्या दिनांक-१४ फेब्रुवारी, २०२२ - सोमवार आहे. उद्याचा दिवस, "व्हॅलेन्टाईन्स डे हा प्रेम दिवस म्हणून १४ फेब्रुवारी रोजी जगभर साजरा केला जातो. हा एक ख्रिश्चन सण सुद्धा आहे. हा दरवर्षी १४ फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी लोक आपल्या आवडत्या व्यक्तीला शुभेच्छा संदेश, फुले किंवा चॉकलेट पाठवून प्रेम व्यक्त करतात." तेव्हा चला तर वाचूया, प्रेम-दिना निमित्त लेख, यामागचा इतिहास, कथा, शुभेच्छा संदेश, प्रेम-चारोळ्या, प्रेम-मेसेज इत्यादी.

                         व्हॅलेंटाईन डे प्रेम कविता---

????रात्री आकाश ओसंडुन गेले
होते तार्‍यांनी,
मी तुला शोधत उभा तर
वेड्यात काढले मला सार्‍यांनी!
--Happy Valentine day????

                 Valentines Day Poem For Husband---

????नाही आज पर्यंत बोलता आले,
आज ते सारे तुझ्यापुढे मांडणार आहे
... नाही जगू शकत तुझ्याशिवाय,
इतकेच तुला सांगणार आहे...
--प्रेम दिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!????

                            व्हॅलेंटाईन डे शायरी---

????नेहमी तुला विसरायचं ठरवुन
नेहमी तुला आठवत राहते
स्व:ताला कधी विसरता येतं का?
उमगुन मग स्वःतावर हसत राहते!
--Happy Valentines Day!????

                       Valentine Day prem kavita.---

????पाहशील जिथे जिथे नजर उचलून...
मीच असेल उभा ओठांवर स्मित घेऊन
आलेत कधी जर तुझ्या डोळ्यात
दुखांचे अश्रू....
तुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे देऊन.......!!!
--Happy Valentines Day!????


--AUTHOR UNKNOWN
-------------------------


                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-ऑल इन मराठी.कॉम)
                   ----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-13.02.2022-रविवार.