II व्हॅलेन्टाईन्स डे-प्रेम दिवस II-कविवर्य चंद्रशेखर गोखले-प्रेम चारोळ्या-1

Started by Atul Kaviraje, February 13, 2022, 07:25:31 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 II व्हॅलेन्टाईन्स डे-प्रेम दिवस II
                                     कविवर्य चंद्रशेखर गोखले 
                                      प्रेम चारोळ्या क्रमांक-1
                               ------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     उद्या दिनांक-१४ फेब्रुवारी, २०२२ - सोमवार आहे. उद्याचा दिवस, "व्हॅलेन्टाईन्स डे हा प्रेम दिवस म्हणून १४ फेब्रुवारी रोजी जगभर साजरा केला जातो. हा एक ख्रिश्चन सण सुद्धा आहे. हा दरवर्षी १४ फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी लोक आपल्या आवडत्या व्यक्तीला शुभेच्छा संदेश, फुले किंवा चॉकलेट पाठवून प्रेम व्यक्त करतात." तेव्हा चला तर वाचूया, प्रेम-दिना निमित्त लेख, यामागचा इतिहास, कथा, शुभेच्छा संदेश, प्रेम-चारोळ्या, प्रेम-मेसेज इत्यादी.

              प्रेमातील विविध भाव व्यक्त करणाऱ्या सुंदर चारोळ्या---

     वर्षातील दुसऱ्या महीन्यातला दुसरा आठवडा जरा जास्तच स्पेशल असतो, तो म्हणजे व्हॅलेंटाईन डे वीक असल्यामुळे. या दिवशी आपल्या मनातील गोष्ट तिला किंवा त्याला सांगण्यासाठी अनेकजण वाट पाहत असतात. पण प्रेम हे सदाबहार आहे. या प्रेमाची अनेक रूपं आहेत. अनेक गोष्टीतून प्रेम तुम्ही व्यक्त करू शकता. मग तो एखादा व्हॉटसअॅप मेसेज असो गुलाबांचा गुच्छ असो... एखादी सुंदर चारोळी अथवा प्रेमाचा संदेश (valentine's day quotes in marathi) लिहा आणि तुमच्या आवडत्या व्यक्तीला द्या.
1. Love Poems For Valentines Day In Marathi
व्हॅलेंटाईन डे साठी प्रेम कविता (Love Poems For Valentines Day)
मराठीतील प्रेम कविता तुम्ही वाचल्या असतील. पण आज आम्ही तुमच्यासाठी खास व्हॅलेंटाईन डे च्या अखेरीला घेऊन आलो आहोत, प्रेमातील अनेक भावना आणि त्यावरील कविवर्य चंद्रशेखर गोखले यांच्या सुंदर चारोळ्या.
2. Love Poems For Valentines Day In Marathi
Also Read How To Decorate Home On Valentines Day In Marathi

     व्हॅलेंटाईन्स डे... आज त्याने ठरवलेलं की तिला गाठून मनातल सांगायचंच. मित्रांनीही त्याला धीर दिला होता. अखेर त्याने तिला गाठलं आणि गुलाबाचं फुल तिच्या हाती दिलंच. तिनेही काहीही न बोलता सहज होकार दिला.

ओठात गुदमरलेले शब्द
अलगद डोळ्यांकडे वळले
पापण्य़ा जरा थरथरल्या
म्हणून गुपित तुला कळले...#चंगो

पापण्या झुकल्याशिवाय...
संवाद पूर्ण होत नाही
अन गालात हसू दाटल्याशिवाय
त्याला अर्थ येत नाही...#चंगो

मला नाही जमत शब्दात मांडायला
मनातल्या सगळ्या गोष्टी
उगीच वाटतं एखादी नाजूक भावना
शब्दानं होईल उष्टी...#चंगो

तो तिच्याकडे पहायचा तेव्हा
नेमकं तिचं लक्षच नसायचं
खरंतर तो पाहतोय की नाही
यावर तिचं बारीक लक्ष असायचं...#चंगो

प्रेमातल्या काही गोष्टी खरंच किती गोड असतात नाही का....
तुझं हे नेहमीचं झालंय
आल्या आल्या निघणं
मी जाते, मी निघते म्हणताना
मी थांबवतोय का बघणं....#चंगो

जेव्हा 'ती'बसते
प्राजक्ताकडे करून पाठ
तेव्हा समजावं 'ती' बघतेय
कुणाच्या येण्याची वाट...#चंगो

नसते उगीच भास होतात
तू यायची असलीस की
मग डोळे म्हणतात हा भासच आहे
तू येताना दिसलीस की...#चंगो

ते दोघं
बोलण्यासाठी भेटायचे
अन त्या आधी बराच वेळ
भेट ठरवण्यासाठी बोलायचे...#चंगो

भेट झाली...'आय लव्ह यू' म्हणून झालं...दिवस कसा अगदी पटकन गेला. पण घरी आल्यावरही तो अजून तिच्याच विचारात आहे.
तू समोर असलीस की
नुसतचं तुला बघणं होतं
आणि तू जवळ नसताना
तुझ्यासोबत जगणं होतं...#चंगो

मिठी या शब्दात
केवढी मिठास आहे
नुसता उच्चारला तरी
कृतीचा भास आहे....#चंगो

तेव्हा कसं तू यायच्या वेळी
झुळूक वहायची वाऱ्याची
अन मंजूळ खळखळ सुरू व्हायची
मनातल्या झऱ्याची...#चंगो


--चारोळीकार-चंद्रशेखर गोखले
---------------------------

--संकलक-आदिती दातार
-----------------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                  ---------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-13.02.2022-रविवार.