II व्हॅलेन्टाईन्स डे-प्रेम दिवस II-कविवर्य चंद्रशेखर गोखले-प्रेम चारोळ्या-4

Started by Atul Kaviraje, February 13, 2022, 07:30:04 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 II व्हॅलेन्टाईन्स डे-प्रेम दिवस II
                                     कविवर्य चंद्रशेखर गोखले 
                                      प्रेम चारोळ्या क्रमांक-4
                              --------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     उद्या दिनांक-१४ फेब्रुवारी, २०२२ - सोमवार आहे. उद्याचा दिवस, "व्हॅलेन्टाईन्स डे हा प्रेम दिवस म्हणून १४ फेब्रुवारी रोजी जगभर साजरा केला जातो. हा एक ख्रिश्चन सण सुद्धा आहे. हा दरवर्षी १४ फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी लोक आपल्या आवडत्या व्यक्तीला शुभेच्छा संदेश, फुले किंवा चॉकलेट पाठवून प्रेम व्यक्त करतात." तेव्हा चला तर वाचूया, प्रेम-दिना निमित्त लेख, यामागचा इतिहास, कथा, शुभेच्छा संदेश, प्रेम-चारोळ्या, प्रेम-मेसेज इत्यादी.

     आयुष्य अगदी बदलून गेलंय तिला भेटल्यापासून. तिचं बोलणं, तिला भेटणं, तिच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवणं. काही दिवसांपूर्वी तिला फक्त लांबून बघणारा आणि प्रेमाची कबुली तिच्याकडे कशी करू याचा विचार करणारा तो. आता मात्र तिच्यासोबत प्रत्येक क्षण जगतोय.

माझ्या आयुष्याचे दोन भाग पडतात
एक तू दिसण्याआधी दुसरा तुला पाहिल्यानंतर
आणि तसं पाहिलं तर दोघात
फक्त एका श्वासाचं अंतर... #चंगो

नेहमीच तो तिच्या
आधी येऊन बसायचा
अन कितीदा ती गेल्यावर
तो तिथेच बसलेला दिसायचा...#चंगो

माझ्या आठवणीत सगळं आहे
तुझं रागावणं आणि रुसणं
फक्त आता मला बघायचंय तुझं
एकांतात मला आठवत बसणं....#चंगो

मी आसवाला म्हंटलं...
तो समोर असेपर्यंत थांब
तू काय आत्ता ओघळून जाशील
पण त्याला जायचंय बरंच लांब....#चंगो


--चारोळीकार-चंद्रशेखर गोखले
---------------------------

--संकलक-आदिती दातार
-----------------------

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                 ---------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-13.02.2022-रविवार.