II व्हॅलेन्टाईन्स डे-प्रेम दिवस II-कविवर्य चंद्रशेखर गोखले-प्रेम चारोळ्या-6

Started by Atul Kaviraje, February 13, 2022, 07:33:01 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 II व्हॅलेन्टाईन्स डे-प्रेम दिवस II
                                     कविवर्य चंद्रशेखर गोखले 
                                      प्रेम चारोळ्या क्रमांक-6
                               ------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     उद्या दिनांक-१४ फेब्रुवारी, २०२२ - सोमवार आहे. उद्याचा दिवस, "व्हॅलेन्टाईन्स डे हा प्रेम दिवस म्हणून १४ फेब्रुवारी रोजी जगभर साजरा केला जातो. हा एक ख्रिश्चन सण सुद्धा आहे. हा दरवर्षी १४ फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी लोक आपल्या आवडत्या व्यक्तीला शुभेच्छा संदेश, फुले किंवा चॉकलेट पाठवून प्रेम व्यक्त करतात." तेव्हा चला तर वाचूया, प्रेम-दिना निमित्त लेख, यामागचा इतिहास, कथा, शुभेच्छा संदेश, प्रेम-चारोळ्या, प्रेम-मेसेज इत्यादी.

     आज तिला कळलं की, त्याचं तिच्यावर प्रेम नव्हतं. खरंतर हे तिला अनेकदा तिच्या मित्रमैत्रिणींनी सांगण्याचा प्रयत्नही केला होता. पण तिचं त्याच्यावर भाबडं प्रेम होतं आणि राहीलंही. कारण त्याच्याशिवाय जगणंही तिला शक्य नाहीये. भलेही त्याचं तिच्यावर प्रेम नसलं तरीही तिची प्रेमाची भावना मात्र कायम राहणार आहे. कारण प्रेमाला सीमा नाहीत.

तू फसवतोयस हे कळायचं
तुझ्या डोळ्यात बघून..
पण मी म्हणायचे जाऊदे..नाहीतर
मी स्वता:ला फसवत राहीन तुझ्याशिवाय जगून...#चंगो

तुझी सावलीसुद्धा ओळखेन
कधी हरवलास तर
अरे पण मी मागे राहीनच कशी?
तू कधी माझ्यापासून दुरावलास तर...#चंगो

आठवणी जपल्या जातात
स्वप्नं राखली जातात अन कधी
स्वप्नासकट दु:खसुद्धा
बंद पापणीआड झाकली जातात...#चंगो

मला माझी हार मान्य आहे
म्हणजे तू जिंकलास असं होत नाही ...
डाव तुझ्याहाती देऊनही
जिंकता तुला येत नाही...#चंगो

नुसतं दिसणं पुरेसं असतं
बोलायची गरज नसते
अशी नजरभेट मग कितीवेळ
मागल्यादारी मी आठवत बसते...#चंगो

मनातल्या मनात भुयार
खणता यायला हवं
कुणाला न विचारता तुझ्याबद्दल
जाणता यायला हवं...#चंगो

तू विझत असताना
तुझ्याभोवती मी ओंजळ धरली
तू तेवत राहिलास
नि प्रकाशाने माझी ओंजळ भरली...#चंगो

माझं कसं होअील हा प्रश्न
आता मला पडत नाही
कारण सूर्य बुडताना दिसला
तरी खरा तो बुडत नाही....#चंगो


--चारोळीकार-चंद्रशेखर गोखले
---------------------------

--संकलक-आदिती दातार
-----------------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                 ----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-13.02.2022-रविवार.