II व्हॅलेन्टाईन्स डे-प्रेम दिवस II-कविवर्य चंद्रशेखर गोखले-प्रेम चारोळ्या-7

Started by Atul Kaviraje, February 13, 2022, 07:34:32 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 II व्हॅलेन्टाईन्स डे-प्रेम दिवस II
                                     कविवर्य चंद्रशेखर गोखले 
                                      प्रेम चारोळ्या क्रमांक-7
                              -------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     उद्या दिनांक-१४ फेब्रुवारी, २०२२ - सोमवार आहे. उद्याचा दिवस, "व्हॅलेन्टाईन्स डे हा प्रेम दिवस म्हणून १४ फेब्रुवारी रोजी जगभर साजरा केला जातो. हा एक ख्रिश्चन सण सुद्धा आहे. हा दरवर्षी १४ फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी लोक आपल्या आवडत्या व्यक्तीला शुभेच्छा संदेश, फुले किंवा चॉकलेट पाठवून प्रेम व्यक्त करतात." तेव्हा चला तर वाचूया, प्रेम-दिना निमित्त लेख, यामागचा इतिहास, कथा, शुभेच्छा संदेश, प्रेम-चारोळ्या, प्रेम-मेसेज इत्यादी.

     त्यांच्या लग्नाला आज 50 वर्ष पूर्ण झाली. आज व्हॅलेंटाईन डे ला नातवांनी आग्रह केल्याने ते दोघंही बाहेर पडले. त्याने तिला बरेच वर्षांनंतर आज गजरा घेऊन दिला. तिच्या केसांत अलगद माळला. तिच्याही डोळ्यात इतक्या वर्षांचा सहजीवनाचा सुंदर प्रवास आठवून भरून आलं.

तिला भरून आलं की
त्यालाही येतं जरासं भरून
मग तो डोळे कोरडे ठेवायला धडपडतो
काहीही करून....#चंगो

प्राजक्त फुलताना पहायचा म्हणून
आपण पहाटेपर्यंत जागायचो
कसं ना, तेव्हा आपण...
अगदी वेड्यासारखे वागायचो....#चंगो

तू माझं असणं
किती छान आहे
नाहीतर हे जग म्हणजे...
नुसतचं माणसांचं रान आहे....#चंगो

दिवसाची सुरुवात म्हणजे
एकदा आरशात बघायचं
आणि ठरवून टाकायचं
बास! आता आपण जगायचं...#चंगो

लक्षात ठेवा की, आपल्या भावनांना व्यक्त करतानाच दुसऱ्यांच्या भावनांचाही आदर करा. शेवटी काय....प्रेम करा आणि आनंदी राहा. कारण बाकी सब झूट आहे.


--चारोळीकार-चंद्रशेखर गोखले
---------------------------

--संकलक-आदिती दातार
-----------------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                 ----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-13.02.2022-रविवार.