II व्हॅलेन्टाईन्स डे-प्रेम दिवस II-चित्रपट गीत क्रमांक-5

Started by Atul Kaviraje, February 14, 2022, 12:17:21 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 II व्हॅलेन्टाईन्स डे-प्रेम दिवस II
                                      चित्रपट गीत क्रमांक-5
                               ------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१४ फेब्रुवारी, २०२२ - सोमवार आहे. आजचा दिवस, "व्हॅलेन्टाईन्स डे हा प्रेम दिवस म्हणून १४ फेब्रुवारी रोजी जगभर साजरा केला जातो. हा एक ख्रिश्चन सण सुद्धा आहे. हा दरवर्षी १४ फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी लोक आपल्या आवडत्या व्यक्तीला शुभेच्छा संदेश, फुले किंवा चॉकलेट पाठवून प्रेम व्यक्त करतात." तेव्हा चला तर वाचूया, प्रेम-दिना निमित्त मराठी चित्रपटातील काही प्रेम-गीते.

     'Tola Tola', the wonderful track from 'Tu Hi Re' sung by Amritraj and Bela Shende featured Swapnil Joshi and Tejaswini Pandit. This romantic melody picturises the beautiful moments between Swapnil and Aditi. This song that became the top trend on its release, continues to trend even now.

     Tola Tola Lyrics from Tu Hi Re. Song Composed by AmitRaj, Lyrics by Guru Thakur and sung by Bela Shende and Amit Raj.


                                  का जीव तोळा तोळा

का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो
उगाच मागेमागे तुझ्या भिरभिरतो
हरवूनी तुझ्यात मी पुन्हा पुन्हा का
नाव तुझे गुणगुणतो....
का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो
तुझ्या नशील्या नजरेत मी ही गुरफटते
शहारते रे मन वेडे तुझ्यातच विरते
हसता तू जरा खोल काळजात हुळहुळे
बोलणे सांगणे सारे ओठांवर अडखळे
हरवूनी तुझ्यात मी पुन्हा पुन्हा का
नाव तुझे गुणगुणतो...
तुझाच होतो जगणे ही माझे मी विसरतो
करु नये ते सारे काही तुझ्या साठी करतो
ऐक ना एकदा तुझे नाव माझ्या श्वासातले
नेमके सांगना काय नाते तुझ्या माझ्यातले
हरवूनी तुझ्यात मी पुन्हापुन्हा का
नाव तुझे गुणगुणतो..

======================
मराठी चित्रपट : तू  ही  रे
कास्टिंग: स्वप्नील जोशी आणि तेजस्विनी पंडित
संगीतकार : अमित  राज
गीतकार : गुरु  ठाकूर
गायक : बेला  शेंडे , अमित  राज
म्युझिक लेबल : व्हिडिओ  पॅलेस
=======================


                          (साभार आणि सौजन्य-लैरिकस कट्टा.कॉम)
                       (संदर्भ-टाइम्स ऑफ इंडिया.इंडिया टाइम्स.कॉम)
                     --------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.02.2022-सोमवार.