"१४-फेब्रुवारी –दिनविशेष"

Started by Atul Kaviraje, February 14, 2022, 08:07:41 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१४.०२.२०२२-सोमवार.जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"


                                    "१४-फेब्रुवारी –दिनविशेष"
                                   ------------------------


अ) १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या घटना.
   ------------------------------

१८७६: अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल व एलिशा ग्रे यांनी एकाच दिवशी टेलिफोनच्या पेटंटसाठी अर्ज केला.

१८८१: भारतातील पहिल्या होमिओपाथिक कॉलेजची कोलकाता येथे स्थापना.

१८९९: अमेरिकेत निवडणुकांसाठी मतदान यंत्रे वापरण्यास सुरूवात झाली.

१९२४: संगणक तयार करणारी कंपनी आय.बी.एम ची स्थापना.

१९४५: दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्स च्या विमानांनी तुफानी बॉम्बफेक करुन जर्मनीतील ड्रेस्डेन शहर बेचिराख केले.

१९४५: चिली, इक्वेडोर, पॅराग्वे व पेरू या देशांचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

१९४६: पहिला संगणक एनियाक युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनियात प्रदर्शित करण्यात आला.

१९४६: बँक ऑफ इंग्लंडचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.

१९६३: अणुक्रमांक १०३ असलेले लॉरेन्सिअम हे मूलद्रव्य प्रथमच तयार करण्यात आले.

१९८९: भोपाळ दुर्घटनेबद्दल भारत सरकारला ४७,००,००,००० अमेरिकन डॉलर नुकसान भरपाई देण्याचे यूनियन कार्बाईडने कबूल केले.

१९८९: ईराणच्या आयातोल्ला खोमेनीने ब्रिटिश लेखक सलमान रश्दीच्या खूनाचा फतवा काढला.

२०००: अभिजित कुंटे हा भारताचा चौथा आणि महाराष्ट्राचा दुसरा ग्रॅंडमास्टर बनला.

२००३: नाटककार महेश एलकुंचवार यांची के.के. बिर्लाफांउंडेशनतर्फे दिल्या जाणार्‍या सरस्वती सन्मानासाठी निवड.

=========================================

ब) १४ फेब्रुवारी रोजी झालेले जन्म.
  ----------------------------

१४८३: पहिला मुघल सम्राट, हिन्दुस्थानातील मुघल सत्तेचा संस्थापक बाबर यांचा जन्म. (मृत्यू: २६ डिसेंबर १५३०)

१९१४: ऊर्दू शायर व गीतकार जान निसार अख्तर यांचा जन्म. (मृत्यू: ९ ऑगस्ट १९७६)

१९१६: कवयित्री संजीवनी मराठे यांचा जन्म. (मृत्यू: १ एप्रिल २०००)

१९२५: केन्द्रीय मंत्री व सामाजिक कार्यकर्ते मोहन धारिया यांचा जन्म. (मृत्यू: १४ ऑक्टोबर २०१३)

१९३३: अभिनेत्री मुमताज जहाँ बेगम देहलवी ऊर्फ मधुबाला यांचा जन्म. (मृत्यू: २३ फेब्रुवारी १९६९ – मुंबई)

१९५०: वकील आणि केंद्रीय मंत्री कपिल सिबल यांचा जन्म.

=========================================

क) १४ फेब्रुवारी रोजी झालेले मृत्यू.
   ----------------------------

१४०५: मंगोलियाचा राजा तैमूरलंग यांचे निधन. (जन्म: ८ एप्रिल १३३६)

१९७४: आग्रा घराण्याचे गायक, शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक व संगीत गुरू श्रीकृष्ण नारायण रातंजनकर यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १९००)

१९७५: इंग्लिश लेखक पी. जी. वूडहाऊस यांचे निधन. (जन्म: १५ ऑक्टोबर १८८१)

१९७५: ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ ज्यूलियन हक्सले यांचे निधन. (जन्म: २२ जून १८८७)

=========================================


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.02.2022-सोमवार.