छोट्या मुलाचे मजेदार गाणे-ओ सर…..

Started by Atul Kaviraje, February 14, 2022, 09:00:18 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

      आज ऐकुया खूपच गाजत असलेले ओ शेठच्या धर्तीवर, एका लहान मुलाने गायिलेले सुंदर गाणे-ओ सर.....

     ओsss शेठ नंतर ओsss सर, छोटा मुलगा म्हणतो 'आठवण तुमची लय हो आली,' व्हायरल गाण्याची धूम. सध्या मात्र ओ शेठ या गाण्याच्या तालावर एका छोट्या मुलाचे मराठी गाणे चांगलेच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये छोटा मुलाला कोरोनामुळे शाळा बंद झाल्यामुळे आपल्या शिक्षकांची चांगलीच आठवण झाली आहे.

     गायक उमेश गवळी यांच्या आवाजातील 'ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट...' या गाण्याने महाराष्ट्राला अक्षरश: वेड लावलं. या गाण्याला आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी पाहिले आहे. एवढंच नाही, तर लग्न समारंभ किंवा इतर कार्यक्रमात लोक या गाण्यावर हमखास थिरकत आहेत. सध्या मात्र ओ शेठ या गाण्याच्या तालावर एका छोट्या मुलाचे दुसरे मराठी गाणे चांगलेच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील छोट्या मुलाला कोरोनामुळे शाळा बंद झाल्यामुळे आपल्या शिक्षकांची चांगलीच आठवण झाली आहे. हा छोटासा मुलगा 'ओ सर नाही पडणार तुमचा विसर' हे गाणं गाताना दिसतोय. (after o sheth marathi song small boy o sir marathi new song went viral on social media)

                         ओ शेठच्या धर्तीवर ओ सर....

     ओ शेठ या गाण्याला उमेश गवळी गायलं असून संध्या आणि प्रणिकेत यांनी त्याला लिहलेलं आहे. या या गाण्याची रेकॉर्डिंग केल्यानंतर त्याला एवढी प्रसिद्धी मिळेल याची कल्पना कोणालाही नव्हती. मात्र, या गाण्याला युट्यूब तसेच इतर माध्यमांवर कोटीच्या संख्येने पाहिले गेले. या गाण्याला महाराष्ट्राने अक्षरश: डोक्यावर घेतले. याच गाण्याच्या तालावर आता एका छोट्या मुलाचे मजेदार गाणे व्हायरल होत आहे. या गण्यात कोरोनामुळे शाळा बंद झाल्या आहेत. ऑनलाईन शिकवणी सुरु आहे. मात्र, ऑनलाईन शाळा भरत असल्यामुळे मला माझ्या सरांची खूप आठवण येत आहे, असे व्हिडीओतील छोटा मुलगा म्हणताना दिसतोय.

     असे हा छोटा मुलगा अगदी मजेदार पद्धतीने म्हणताना दिसत आहे. हा व्डिडीओ नेटकऱ्यांना चांगलाच आवडला आहे. लोक या व्हिडीओला पाहून मजेदार कमेंट्स करत आहेत. तसेच या व्हिडीओ उत्स्फूर्तपणे शेअर करत आहेत. व्हायरल होत असलेला हा नवा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, त्याला फेसबुकवर 'आईच्या गावात अन 12 च्या भावात' या मराठी पेजवर अपलोड करण्यात आले आहे. हा व्हिडीओ नेटकऱ्यांना चांगलाच आवडला आहे.

   कोरोना काळात एका मुलाने आपल्या शिक्षकाला केलेली विनंती नक्की ऐका 🙏🙏


कोरोनानं शाळा बंद हो झाली
आठवण तुमची लय हो आली
कोरोनानं शाळा बंद हो झाली
आठवण तुमची लय हो आली
ओsss सर
ओsss सर
नाही पडणार तुमचा विसर
ओ sss सर
आहे आमच्यावर आहे तुमचा असर

ऑनलाईन  ऑफलाईन  पद्धत  आली
शाळेसारखी   नाही  मज्जा  आली
ऑनलाईन  ऑफलाईन  पद्धत  आली
शाळेसारखी   नाही  मज्जा  आली
ओsss सर
ओsss सर
नाही पडणार तुमचा विसर
ओ sss सर
आहे आमच्यावर आहे तुमचा असर

कोरोना  का  आमच्या  माथी  आला
मोबाईल  जरी  आमच्या  हाती  आला
कोरोना  का  आमच्या  माथी  आला
मोबाईल  जरी  आमच्या  हाती  आला
ओsss सर
ओsss सर
नाही पडणार तुमचा विसर
ओ sss सर
आहे आमच्यावर आहे तुमचा असर

कोरोनानं शाळा बंद हो झाली
आठवण तुमची लय हो आली
कोरोनानं शाळा बंद हो झाली
आठवण तुमची लय हो आली
ओsss सर
ओsss सर
नाही पडणार तुमचा विसर
ओ sss सर
आहे आमच्यावर आहे तुमचा असर

===================
author-टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
Edited By-प्रज्वल  ढगे
===================
🎤संगीत रिदम 🎧
    विक्की देशमुख
कसमादे स्टुडिओ 🙏🙏🙏
===================


                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-टी व्ही ९ मराठी.कॉम)
                   -----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.02.2022-सोमवार.