"ST कर्मचाऱ्याचा शाहिरी अंदाज भावतोय,पोवाड्यातून आपल्या मागण्यांचे गीत गातोय"

Started by Atul Kaviraje, February 15, 2022, 01:34:22 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

  विषय : हिंगोली येथे  ST कर्मचाऱ्यांच्या  मागण्या  शाहिरी  गीतातून  मांडल्या  गेल्या .
             वास्तव -ST कर्मचाऱ्यांच्या  मागण्या  शाहिरी  अंदाजातून -चारोळ्या .
                            ST- शाहीर  कर्मचाऱ्यांचे  मनोगत
"ST कर्मचाऱ्याचा शाहिरी अंदाज भावतोय,पोवाड्यातून आपल्या मागण्यांचे गीत गातोय"
-------------------------------------------------------------------------


(1)
सुसज्ज  पेटी , तबले-डफलीवाल्या  सहाय्यकांसह  मारून  बैठक , हा  ST कर्मचारी
ठेका  धरा  सारे  श्रोते  कर्मचारी , पहा  मी  सादर  करतोय  तुम्हांपुढे  "शाहिरी"
या  "पोवाड्याचा"  सूर  पहा  मी  उचललाय , पोहोचेलच  तो  सरकारच्या  कानांवरी ,
मागण्यांचा हा हटके अंदाज,मला कळवा LIKE करून,तुम्ही SOCIAL MEDIA -वरी .

(2)
संप  करून  कंटाळलोय  आम्ही , ताण  तणाव  वाढत  चाललेत
त्या  सुरात  मागण्यांना  आता  काहीच  अर्थ  नुरलाय , निरर्थकच  होत  चाललेत
आता हा "पोवाड्याचा" पहाडी  सूरच आम्हा  नेईल  तारून , मागण्या  मान्य  करून ,
संपIला आम्ही हलकेच  दिलीय कलाटणी , ही  "शाहिरी"  लोक -कला  सादर  करून .

(3)
हा  "शाहीर"  गातो , "पोवाड्यातून"  सांगतो , मुख्य  मुद्दा  विलीनीकरणाचा , गीतातून
न  भूतो , न  भविष्यती असे  आंदोलन , घडतंय  आज  आमच्या  हातून
असह्य  होऊन  बंधूनी  माझ्या  केल्या  होत्या  आत्महत्त्या , नाईलाजास्तव ,
या  गीतातून  मी  त्यांना  वाहतोय  श्रद्धांजली , जाणून  हेचि  वास्तव .

(4)
सरकारची  खरी  गोम  येतेय  लक्ष्यात , खरं  मर्म  जाणवतंय  आतासे
टाळाटाळ  करतंय  सरकार , दाखवून  कधी  नरम -गरम  कलम  कायद्याचे , नकोसे
माघार  नका  घेऊ  तुम्ही , कर्मचाऱ्यांनो  कायम  रहा  आपल्या  वचनास   ,
मनोबल  वाढविण्या  तुमचे , गातो  मी , हा  "पोवाडाच"  येईल  तुमच्या  रक्षणास .

(5)
कितीही  होवो  त्रास , कितीही  येवोत  संकटे , डटकर  करा  मुकाबला
शिवरायांचा , जाणत्या  राजाचा  इतिहास , पहा  मी  "पोवाडारूपे"  तुम्हांपुढे  गाईला
त्यांचे  आठवावे  रूप , त्यांचा  आठवावा  प्रताप , कसे  मिळविले  त्यांनी  स्वराज्य ,
हाच  मराठी  बाणा  बाळगून  अंगी , तुम्हीच  राखावे  आपले  साम्राज्य .

(6)
स्फूर्तिदायी ,प्रेरणादायी  माझे  हे  कवन , तुमच्यात  नवी  उमेद  जागवेल
शब्दाशब्दांतून , ओळीओळींतून  माझ्या , तुमच्यात  नवा  उत्साह वीर -रस  प्रसवेल
माझ्या  या  "शाहिरी"  गीतातून , मी  सर्वकाही  मांडल्यात  तुमच्या  अंतस्थ  भावना ,
त्या परमेश्वराशी एकच मागणे या गीतातून , पूर्ण  व्हाव्यात  तुमच्या  साऱ्या  मनोकामना .


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.02.2022-मंगळवार.