शपथविधी-चारोळ्या-"स्वच्छता मोहीम राबवली जातेय,कचरा निर्मूलनाची शपथ वाहिली जातेय"

Started by Atul Kaviraje, February 16, 2022, 01:37:37 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

 विषय : यवतमाळ येथे उमेदवारांनी कचऱ्याच्या ढिगासमोर  उभे  राहून  शपथ  घेतली .
                            अनोखा  शपथ -विधी  चारोळ्या
        "स्वच्छता मोहीम राबवली जातेय,कचरा निर्मूलनाची शपथ वाहिली जातेय         --------------------------------------------------------------------------


(1)
एक  अनोखे  दृश्य  समोर दिसत  होते ,रस्त्यालगत  "कचऱ्याचा"  ढीग  साठला  होता
काही  लोक  त्या  "कचऱ्याची"  नीट  पाहणी  करीत  होते ,एकमेकांशी  बोलत  होते
पहाता -पहाता त्यांचे हात  खांद्यांशी  समांतर  आले ,"कचऱ्यासमोर"  मन  स्थिर  झाले ,
मुखातून ,एकसुरात ,एकवाक्यात  ते  "कचरा"  सफाईची  "शपथ"  घेते  झाले .

(2)
होय  मित्रानो , यवतमाळ  येथे  हा , अभूतपूर्व  "शपथ -विधी"  पार  पडला
न  पाहिलेला ,न  ऐकलेला  ,न  अनुभवलेला ,असा  "शपथ -विधी"  प्रथमच  दिसला
स्थानिक  उमेदवारांनी  स्वच्छता  मोहिमेची , साफ -सफाईची  मोहीम  राबवली  होती ,
यापुढे हा"कचरा"आम्ही पुन्हा होऊ नाही देणार,परिसर स्वच्छ ठेवणार,याची त्यांनी "शपथ"  वाहिली  होती .

(3)
उशिरा  का  होईना ,त्यांना  स्वच्छतेचे ,आरोग्याचे  महत्त्व  होते  कळलेले
नागरिकांना  येथून  प्रवास  करणे ,चालणेही  होते  नकोसे  झालेले
महानगर -पालिकेचा नाकर्तेपणा,गाफीलता,गलथान कारभार यासी  कारणीभूत  झालेले ,
आणि म्हणूनच त्यांनी हे स्वच्छता-मोहिमेचे होते"शपथ"घेऊन अभिनव पाऊल उचललेले .

(4)
मनातून  कळकळ  होती  त्यांना , CLEAN  CITY-चे  पारितोषिक , बक्षीस  नको  होते
नागरिकांच्या आरोग्याचा , स्वास्थ्याचाच  होता  हा  प्रश्न ,त्यांनी  स्वतः  ते  अनुभवले  होते
हा"शपथ -विधी"त्यांच्या  हृदयातील  जनतेसाठीचा  कळवळा ,आपलेपणा  सांगून  गेला ,
या  उमेदवारांमध्ये  वाहत  होता  माणुसकीचा  झरा ,होता  एक  माणूस  भला .

(5)
किती  चांगले  होईल ,साऱ्या  राज्याने ,देशाने  त्यांच्या  पावलावर  पाऊल  ठेवले  तर
स्वच्छता म्हणजे आरोग्य,देव  म्हणणाऱ्या , गांधीजींच्या  आत्म्यास  शांती  लाभेल  खरोखर
याची  लाट  सर्वत्र  पसरावी ,प्रत्येकाने  आपणहून  ही  स्वच्छतेची  शपथ  वाहावी ,
मग  पहा  आपल्या  भारत  देशाचे  चित्र , अस्मानी  उपग्रह  ठळक  दाखवी .

(6)
पण  असं  खरंच  घडेल  का  ? की  हा  शपथ -विधी  फक्त  नावापुरताच  असेल
हा "कचरा"स्वच्छ  होताच ,त्यांची  पाठ  वळल्यावर , पुन्हा  नवीन  ढीग  तयार  असेल ,
नाही जर ही अभिनव योजना असेल राबवायची, तर प्रत्येकाने मनातूनच  शपथ  वाहावी ,
आपापले  घर ,अंगण  स्वच्छ  ठेवीत , देशाची  एक -प्रकारे  सेवाच  घडावी .

(7)
यवतमाळने  सुरु  केलेली  ही  "कचरा"  सफाई  संकल्पना , प्रत्यक्ष  साकार  व्हावी
सुका  "कचरा" ,ओला  "कचरा"  विभागून ,त्याची  योग्य  ती  विल्हेवाट  लावावी
समाजाने ,जनतेने  एकत्र  येऊन  ठिकठिकाणी , स्वच्छता  मोहीम  राबवावी ,
स्वच्छ  भारत -सुंदर  भारत , असा  दिसेल  माझा  देश ,याची  प्रत्यक्ष  प्रचिती  यावी .


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-16.02.2022-बुधवार.