"१६-फेब्रुवारी –दिनविशेष"

Started by Atul Kaviraje, February 16, 2022, 11:29:56 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१६.०२.२०२२-बुधवार.जाणून घेऊया, आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"


                                    "१६-फेब्रुवारी –दिनविशेष"
                                   ------------------------


अ) १६ फेब्रुवारी रोजी झालेल्या घटना.
   ------------------------------

१६५९: पहिला धनादेश ब्रिटीश बँकेतून काढण्यात आला, तो नँशनल वेस्टमिन्स्टर बँकेत जपून ठेवण्यात आला आहे.

१७०४: औरंगजेबाने राजगड किल्ला जिंकून त्याचे नाव नबिशहागड असे ठेवले.

१९१८: लिथुएनियाने रशिया व जर्मनीपासून स्वातंत्र्य जाहीर केले.

१९५९: फिडेल कॅस्ट्रो क्युबाच्या अध्यक्षपदी रुजू झाले.

१९६०: अमेरिकी अणुपाणबुडी ट्रायटन ने पाण्याखालून पृथ्वी प्रदक्षिणा करण्यास प्रस्थान केले.

१९८५: लेबनॉनमध्ये हिजबोल्ला या कट्टरपंथीय शिया मुस्लीम संघटनेची स्थापना झाली.

=========================================

ब) १६ फेब्रुवारी रोजी झालेले जन्म.
   ---------------------------

१२२२: जपानमधील निचिरेन बौद्ध पंथाचे स्थापक निचिरेन यांचा जन्म. (निधन: १३ ऑक्टोबर १२८२)

१८१४: स्वातंत्रवीर सेनापती रामचंद्र पांडुरंग तथा तात्या टोपे यांचा जन्म. (निधन: १८ एप्रिल १८५९)

१८२२: बोटांचे ठसे, रंगांधळेपणा आणि स्त्रियांच्या सौंदर्यावर संशोधन करणाऱ्या सर फ्रान्सिस गाल्टन यांचा जन्म.

१८७६: भारतातील पहिले सीनियर रँग्लर आणि फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे यांचा जन्म. (निधन: ६ मे १९६६)

१९०९: मॅकडोनाल्ड चे सहसंस्थास्थापक रिचर्ड मॅकडोनाल्ड यांचा जन्म. (निधन: १४ जुलै १९९८)

१९५४: वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू मायकेल होल्डिंग यांचा जन्म.

१९६४: ब्राझीलचा फुटबॉलपटू बेबेटो यांचा जन्म.

१९७८: भारतीय क्रिकेटपटू वासिम जाफर यांचा जन्म.

=========================================

क) १६ फेब्रुवारी रोजी झालेले मृत्यू.
   ----------------------------

१९४४: भारतीय चित्रपटाचे जनक धुंडिराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके यांचे निधन. (जन्म: ३० एप्रिल १८७० – त्र्यंबकेश्वर, नाशिक, महाराष्ट्र)

१९५६: खगोल भौतिकशास्त्रज्ञ आणि संसद सदस्य मेघनाथ साहा यांचे निधन. (जन्म: ६ ऑक्टोबर १८९३)

१९६८: कृषी शिरोमणी आणि पहिले मराठी साखर कारखानदार नारायणराव सोपानराव बोरावके यांचे निधन. (जन्म: १७ ऑक्टोबर १८९२)

१९९४: जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक पं. निवृत्तीबुवा सरनाईक यांचे निधन. (जन्म: ४ जुलै१९१२)

१९९६: उद्योगपती, थरमॅक्स उद्योगसमुहाचे संस्थापक आर. डी. आगा यांचे निधन.

२०००: सुप्रसिद्ध ग्रंथालय शास्रज्ञ बेल्लारी शामण्णा केशवान यांचे निधन.

२००१: मराठी चित्रपटांचे नृत्यदिग्दर्शक रंजन साळवी यांचे निधन.

=========================================


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-16.02.2022-बुधवार.