II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II-निबंध क्रमांक-10

Started by Atul Kaviraje, February 19, 2022, 04:31:04 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                             II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II
                                        निबंध क्रमांक-10
                            -----------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१९.०२.२०२२-शनिवार, छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती आहे. "पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी इ. स. १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. ... महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार, १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख २००१ साली स्वीकारली." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींनी शिव-जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या सुमुहूर्तावर लेख,भाषण,निबंध,शुभेच्छा,कोट्स,स्टेटस,सुविचार,शायरी,पोवाडे आणि बरंच काही.

                 छत्रपती शिवाजी महाराज निबंध---

    गरीब मावळ्यांच्या मुलांबरोबर ते खेळू लागले. माणसांची पारख करू लागले. यातूनच त्यांना जिवाला जीव देणारे, सवंगडी लाभले. नानाजी, बाजी, येसाजी, हिरोजी, बहिर्जी किती नावे सांगावीत?

     स्वराज्याची कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी शिवरायांना किती मेहनत करावी लागली! किती अग्निदिव्य करावे लागले! किती मोहरे इरेला घालावे लागले ! धन्य ते शिवबा, धन्य ती जिजामाता आणि धन्य ते जीवावर उदार होऊन स्वराज्यासाठी स्वप्राणाचे बलिदान करणारे मावळे !

     वडिलांकडून शिवरायाला लहानशी जहागीर मिळाली होती परंतु त्यांनी मराठा तेतुका मेळवावा । महाराष्ट्र धर्म वाढवावा हे ब्रीद अंगीकारले. लोकांची संघटना तयार केली. स्वकीय व परकीय बलाढ्य शत्रूचा पराभव केला व स्वराज्य निर्माण केले. अशक्य होते ते शक्य करून दाखवले. शून्यातून स्वराज्य निर्माण केले. म्हणून म्हणावे वाटते,

"कीर्तिवंत, नीतिवंत हे शूरांच्या वीरा ।
तुला हा मानाचा मुजरा, तुला हा मानाचा मुजरा ।"

     शिवरायांची आपल्या सेवकांवर खूप माया होती. 'गड आला पण माझा सिंह गेला म्हणून तानाजीच्या गावी जाऊन रायबाचे लग्न केले. आग्याच्या कैदेत जीवावर उदार होणाऱ्या मदारी मेहतरला शेवटपर्यंत अंतर दिले नाही. शिवरायांनी जातिभेद, धर्मभेद, कधी पाळलाच नाही. प्रतापगडच्या युद्धातील कपटी डाव खानाच्या अंगावर उलटविणाऱ्या शिवाजीराजांना जनतेची फार काळजी वाटे. त्यांच्या सुखासाठी त्यांनी खूप कार्य केले. .

'परस्त्री मातेसमान' मानणाऱ्या शिवबांनी 'स्त्री'चा बहुमान केला.

"जातिधर्म हा मुळी न येथे स्त्रीच असे देवता
राजप्रतिष्ठेहुनी मानतो स्त्रीची मी योग्यता
हवे तुम्हाला स्वराज्य जर हे पुरते ध्यानी धरा"

     स्त्री जातीला प्रथम करावा मानाचा मुजरा ! अशी त्यांची वृत्ती होती. कृती होती म्हणूनच कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला त्यांनी सन्मानाने परत पाठवले अन् हिरकणीच्या नावानं रायगडावर बुरुज बांधला.

     आपल्या बुद्धिचातुर्याच्या जोरावर त्यांनी गनिमी काव्याने अनेक गडकिल्ले घेतले. आत्मविश्वास व मुत्सद्देगिरीच्या जोरावर स्वराज्य उभारले. दिलदारवृत्ती व दूरदृष्टी या गुणांच्या जोरावर बलाढ्य शत्रूशी टक्कर दिली. स्वदेश, स्वधर्म व स्वभाषा यांच्या उत्कर्षासाठी आयुष्यभर झटले व हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार केले. जनताभिमुख राज्यकारभार करणारा हा जाणता राजा. श्रीमान योगी राजा होता. स्फूर्तीचा झरा आहे, राहील.

     हा लहान आणि दीर्घ शिवाजी महाराज निबंध आपल्याला शिवाजीच्या जीवनाबद्दल आणि सत्कर्मांबद्दल सांगतो. त्याला लोकांचा राजा का म्हटले गेले हे आपण शिकतो. त्यांनी अनेक राज्ये एकत्र करून मराठा साम्राज्य निर्माण केले आणि तत्कालीन भारतातील क्रूर शासकांविरुद्ध युद्ध पुकारले. त्याच्या पराक्रमाने राज्यकर्त्यांना घाबरवले. कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याइतपत शिवाजी महाराज हुशार होते.

--AUTHOR UNKNOWN
-------------------------

                         (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीमी.कॉम)
                        ----------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.02.2022-शनिवार.