II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II- भाषण क्रमांक-4

Started by Atul Kaviraje, February 19, 2022, 04:38:51 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II
                                           भाषण क्रमांक-4
                              ------------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१९.०२.२०२२-शनिवार, छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती आहे. "पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी इ. स. १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. ... महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार, १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख २००१ साली स्वीकारली." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींनी शिव-जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या सुमुहूर्तावर लेख,भाषण,निबंध,शुभेच्छा,कोट्स,स्टेटस,सुविचार,शायरी,पोवाडे आणि बरंच काही.

                     छत्रपती शिवाजी महाराज भाषण---

"शिवरायांस आठवावे | जिवित्व तृणवत मानावे |
इहलोकी परलोकी रहावे | किर्तीरुपे ||
शिवरायांचे कैसे चालणे | शिवरायांचे कैसे बोलणें |
शिवरायांचे सलगी देणें | कैसे असे ||
शिवरायांचे आठवावे रुप | शिवरायांचा आठवावा प्रताप |
शिवरायांचा आठवावा साक्षेप | भुमंडळी ||"

     समर्थांच्या या ओळी शिवरायांची महती स्पष्ट करतात. त्यांच्या कर्तृत्वाची आणि दातृत्वाची उंची दाखवून देतात. आज साडे तीन शतके व्यतित झाल्यानंतरही छत्रपतींचे स्मरण तिळमात्रही कमी होत नाहीये. त्यांच्या जीवनावर भाषण करणे म्हणजे माझेच नाही तर ते भाषण ऐकणाऱ्या श्रोत्यांचे देखील सौभाग्य आहे.

     युगपुरुष, स्वराज्य संस्थापक, रयतेचा राजा, छत्रपती अशा एक ना अनेक उपाधी ज्या महापुरुषाला प्राप्त झाल्या आहेत ते दुसरे तिसरे कोणीही नसून अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजीराजे शहाजीराजे भोसले आहेत. शून्यातून स्वराज्य निर्मिती करणारे शिवराय हे संपूर्ण देशासाठी तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर आदर्श आणि प्रजादक्ष राजा मानले गेले आहेत.

     अशा या कर्तृत्वशाली व्यक्तिमत्त्वाचा जन्म फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ या दिवशी म्हणजेच १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी गडावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे मालोजीराजे भोसले तर आईचे नाव जिजाबाई शहाजीराजे भोसले असे होते.

     शिवरायांचे बालपण राजमाता जिजाऊ यांच्या सानिध्यात गेले. शहाजीराजे स्वतः सरदार असल्याने त्यांचे साथीदार ही तेवढेच कुशल, हुशार आणि लढाऊ वृत्तीचे होते. राजमाता जिजाऊ आणि इतर विश्वासू कर्तबगार मंडळी यांचे सानिध्य सतत शिवरायांना लाभत असल्याने त्यांचे व्यक्तित्व हे चांगल्या संस्कारांनी भारले गेले.

     राजमाता जिजाऊ स्वतः शिवरायांना रामायण, महाभारत तसेच इतर वीर पुरुषांच्या कथा सांगत असत. त्यानुसार त्यांचे विचारही त्या दिशेने पराक्रमी बनण्याचे पक्के होत गेले. शहाजीराजे सरदार असल्याने सतत मोहिमांवर असत पण वेळ मिळाल्यास ते शिवरायांना वाचन, युद्धकला, घोडेबाजी शिकवत असत. अशा सर्व शिकवणीमुळे बाल शिवाजी हे मोठेपणी छत्रपती बनू शकले.

--मराठी ब्लॉगर
---------------

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-डेली मराठी न्यूज.कॉम)
                 -----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.02.2022-शनिवार.