II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II-चारोळी, कविता क्रमांक-2

Started by Atul Kaviraje, February 19, 2022, 07:19:51 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II
                                       चारोळी, कविता क्रमांक-2
                               ------------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१९.०२.२०२२-शनिवार, छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती आहे. "पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी इ. स. १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. ... महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार, १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख २००१ साली स्वीकारली." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींनी शिव-जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या सुमुहूर्तावर काही चारोळी व कविता.

                       शिवाजी महाराज कविता

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
निधड्या छातीचा
दनगड कणांचा
मराठी मनांचा
भारत भूमीचा एकच राजा
छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा
मुजरा🙏
🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩
छत्रपती जन्मोत्सवाच्या लक्ष-लक्ष शुभेच्छा 🚩

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
तुमचे उपकार जेवढे मानाव
तेवढे कमीच आहे राजे ,
तुम्ही व तुमची अशी शुरविर मानसं होती म्हणुनच ...
आज आम्ही आहोत .
!! राजे वंदन ञिवार वंदन !

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩विजेसारखी तलवार चालवुन गेला,
निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला,
वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला,
मुठभर मावळ्याना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला!
स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा
केला असा एक "मर्द मराठा शिवबा" होऊन गेला.

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
😠 ताशे तडफणार ...
ह्रदय❤ धडकणार ...
😎 मन थोडे भडकणार ......
पण या देशावरच 🇮🇳⚔काय ...
🌍अख्याजगावर🌎
" 19_फेब्रुवारी " ला "🚩भगवा🚩" झेंडा फडकणार ...🚩🚩🚩🚩
🚩 जयशिवराय

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
रायगडी_मंदीरी_वसे_माझा_राया
चरणाशी_अर्पितो_अजन्म_ही_काया
जगदीश्वराशी_जोडली_ज्यांची_ख्याती
प्रथम_वंदितो_मी_तुम्हा_छत्रपती शिवराया🚩🐅🚩🐆

--अनिकेत
----------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीचारोळी.इन)
                      ------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.02.2022-शनिवार.