II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II-कोट्स क्रमांक-1

Started by Atul Kaviraje, February 19, 2022, 07:22:07 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II
                                            कोट्स क्रमांक-1
                               -----------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१९.०२.२०२२-शनिवार, छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती आहे. "पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी इ. स. १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. ... महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार, १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख २००१ साली स्वीकारली." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींनी शिव-जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या सुमुहूर्तावर
लेख,भाषण,निबंध,शुभेच्छा,कोट्स,स्टेटस,सुविचार,शायरी,पोवाडे आणि बरंच काही.

                   shivaji maharaj quotes

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
१ वेळ दिवाळी आम्ही शांत करीन
पन शिवजयंती अशी करनार
की भागात काय
जगात चर्चा झाली पाहीजे....
जगात भारी... १९ फेब्रुवारी....
आम्ही फक्त शिवरायांचे भक्त

शिवबा शिवाय किंमत नाय.......
शंभू शिवाय हिंमत नाय...
भगव्या शिवाय नमत नाय....
शिवराय सोडून कोणापुढे झुकत नाय
जय जिजाऊ जय शिवराय.....

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

माझ्या राजाला दगडाच्या,
मंदिराची गरज नाही..
माझ्या राजाला रोज,
पुजाव लागत नाही..
माझ्या राजाला दुध-तुपाचा,
अभिषेक करावा लागत नाही..
माझ्या राजाला कधी,
नवस बोलावा लागत नाही..
माझ्या राजाला सोने-चांदीचा,
साज ही चढवावा लागत नाही..
एवढ असुनही जे जगातील,
अब्जवधी लोकांच्या..
हृदयावर अधिराज्य,
गाजवतात असे एकमेव युगपुरुष..
॥ રાખા શિવછત્રપતી ॥

🌺🌺🌺🌺🌺
जन्मदिन शिवरायांचा*
*सोहळा मराठी अस्मितेचा
जय शिवराय ! जय शिवशाही

🌺🌺🌺🌺🌺
ज्या_मातीत जन्मलो_तीचा रंग_सावळा_आहे.
सह्याद्री_असो_वा हिमालय, छाती_ठोक_सांगतो
"मी_छत्रपती_शिवरायांचा_मावळा_आहे.
🚩 जय_जिजाऊ_जय_शिवराय_जय शंभूराजे

--अनिकेत
----------

                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीचारोळी.इन)
                       -------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.02.2022-शनिवार.