II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II-कोट्स क्रमांक-3

Started by Atul Kaviraje, February 19, 2022, 07:27:29 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II
                                             कोट्स क्रमांक-3
                               -----------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१९.०२.२०२२-शनिवार, छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती आहे. "पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी इ. स. १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. ... महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार, १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख २००१ साली स्वीकारली." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींनी शिव-जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या सुमुहूर्तावर
लेख,भाषण,निबंध,शुभेच्छा,कोट्स,स्टेटस,सुविचार,शायरी,पोवाडे आणि बरंच काही.

🌺🌺🌺🌺🌺
चार शतक होत आली,
तरी नसानसांत राजे
आले गेले कितीही
तरी मनामनात राजे
स्वराज्य म्हणजे राजे
स्वाभिमान म्हणजे राजे
🔥शिवजयंतीच्या लक्ष-लक्ष शुभेच्छा🚩

🌺🌺🌺🌺🌺
🚩 # नजऱ तुमची # झलक आमची ... # वंदन करतो
# शिवरायांना🚩
# हात जोड़तो # जिजामातेला ...
# प्रार्थना करतो # तुळजा # भवानीला🚩
# सुखी # ठेव नेहमी
# साखरे # पेक्ष्या गोड माझ्या # शिव # भक्तानां....
🚩 # जगदंब # जगदंब 🚩
🚩🚩 # जय # शिवराय🚩🚩

🌺🌺🌺🌺🌺
विजेसारखी तलवार चालवुन गेला,
निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला,
वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला,
मुठभर मावळ्याना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला!
स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा
केला असा एक "मर्द मराठा शिवबा" होऊन गेला.

🌺🌺🌺🌺🌺
सुर्य नारायण जर उगवले नसते तर..
आकाशाचा रंगचं समजला नसता..
जर छञपती शिवाजी राजे जन्मले नसते तर..
खरचं हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता..
हे हिंदु प्रभो शिवाजी राजा

--अनिकेत
----------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीचारोळी.इन)
                     -------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.02.2022-शनिवार.