II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II-चारोळी, कविता क्रमांक-4

Started by Atul Kaviraje, February 19, 2022, 07:36:50 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II
                                      चारोळी, कविता क्रमांक-4
                               ----------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१९.०२.२०२२-शनिवार, छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती आहे. "पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी इ. स. १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. ... महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार, १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख २००१ साली स्वीकारली." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींनी शिव-जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या सुमुहूर्तावर काही चारोळी व कविता.

एक दिवस आली ती सूंदर पहाट,
सगळीकडे शूकशूकाट,
विजांचा कडकडाट,
ढगांचा गडगडाट,
अशा चिञविचिञ वातावरनात,
भवानी मातेच्या मंदिरात,
शिवनेरी गडात,
जन्मली एक वात,
जी करनार होती मूघलांचा नायनाट,
मराठ्यांचा सरदार,
हिंदवी स्वराज्याचा आधार,
जिजाऊंचा आशिर्वाद वारसदार,
"छञपती शिवाजी महाराज"
निश्चयाचा महामेरु,
बहुत जनांसी आधारु
अखंड स्थितीचा
श्री छत्रपती शिवाजी महाराजांना ३८१ व्या जयंती निमित्त त्रिवार वंदन..
=========================================

सांग ओरडुन जगाला..
भित नाही कोणाच्या
बापाला..
छत्रपतिंचा आशिर्वाद आहे
या मराठ्याला..
वाघनख्याने उभाच फाडतो
आम्ही आडवा येईल
त्याला..
वाघ म्हणतात या मर्दाला..
=========================================

चमकतात आमच्या आज ही तेज
तलवारीच्या धारा,
दिशा बदलतो पाहुन आम्हालाहा वादळी वारा
मावळे आम्ही शिवरायांचे जगने आमचे ताठ,
आडवे जाण्याआधी विचार करा या मर्दमराठ्याशी आहे गाठ
=========================================

ॐ" बोलल्याने मनाला शांती मिळते.
"साई" बोलल्याने मनाला शक्ती मिळते.
"राम" बोलल्याने पाप मुक्ती मिळते.
"जय शिवराय" बोलल्याने आम्हाला शंभर वाघाची ताकद मिळते.
=========================================

सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा!
=========================================

जात, पात, धर्म, वंश, प्रांत, नाते, गोते या मानवी भावनांना कुरवाळत शिवरायांनी सर्वाँना "मावळे" या एकाच जातधर्मात आणले..
=========================================

गरुडाचं पोर ते, गरुडंच व्हनार ते, रयतेचं भलं ज्यात, तेच करणार ते, भवानीचा अभय त्यासी, कुना नाही भ्ययचं......, गुनी मोठं, थोर व्हतं, लेकरु त्या, 'आईचं'......!, अंगी बळ, अन पाठबळ, ...महादेवाच्या, 'पायचं..........!
=========================================

"छत्रपती श्री शिवाजी महाराज" सूर्य किरणे गारव्याला होती जाळत शिवनेरी वर भगवा हि होता खेळत.. येणाऱ्या नव्या पर्वाची लागली होती चाहूल शिव जन्मान पडणार होत पहिलं मराठी पाऊल..... ...मराठ्याचा प्रत्येक अश्रू जिजाऊ ने साठवला होता... आई भवानीस तेज अश्रू देऊन पोटी मराठ्यांचा धनी मागितला होता..

--भागवत रोडगे
---------------

              (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भागवत रोडगे.ब्लॉगस्पॉट.कॉम)
             -----------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.02.2022-शनिवार.