II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II-चारोळी, कविता क्रमांक-5

Started by Atul Kaviraje, February 19, 2022, 07:39:13 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II
                                      चारोळी, कविता क्रमांक-5
                              ------------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१९.०२.२०२२-शनिवार, छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती आहे. "पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी इ. स. १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. ... महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार, १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख २००१ साली स्वीकारली." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींनी शिव-जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या सुमुहूर्तावर काही चारोळी व कविता.

शिवकाळात नांदत होती सु:खात
सारी प्रजा...!!
म्हणुन म्हणती शिवाजी,
माझा जाणता राजा...!!
=========================================

छत्रपति शिवराय'... शिवनेरीच्या क्षितिजावर उगवलेला,शेकडो वर्षाची
काळरात्र चिरून स्वराज्याच्या मंगल प्रकाशाने सगळा आसमंत तेजोमय बनवणारा "
शिवसुर्य "...!!!!
=========================================

कितीक झाले आणी होतिल राजे असंख्य जगती
परी न शिवबासम होइल या अवनीवरती
राजे छत्रपती
=========================================

"वाघाच्या छाव्याला" सांगायची गरज न्हाय,
जय शिवाजी म्हटल तर.... पुढ जय भवानीची हाक हाय,
मराठ्यांचा धनी मराठी मातीचा लेक हाय,
कीर्ती तयाची अफाट हाय ,
तीन्ही लोकी "जय शिवराय" चा जप हाय.
झुकल्या येथे गर्विष्ठ माना शिवरायांनी दिला मराठी बाणा
=========================================

"हातात चिंध्या बांधून"
"मैत्री करणारी आमची जात नाही''
''वेळेप्रसंगी मित्राच्या"
"छाती वरचा घाव''
"झेलल्या शिवाय आम्ही राहत नाही .."
=========================================

नुसतंच डोक्यावर भगवा फेटा घालून व हातात तलवारी मिरवून कोणाला मावळा होता येत नाही.मावळा होण्यासाठी मनगटात रग व छाताडाच्या पिंजर्यात जिगर असावी लागते जिगर.
एक मराठा घडवा एक राष्ट्र बनवा.
॥॰ एकच विचार एकच प्रचार तोही सातासमुद्रापार....॰॥
॥ जय भवानी जय शिवराय ॥
=========================================

एक होते राजे शिवाजी
भिती नव्हती त्याना जगाची..

चिंता नव्हती परिणामांची ..
कारण त्याना साथ होती
भवानी मातेची आणि आई जिजाऊची..
...
त्यांची जात मर्द मराठ्याची,
देशात लाट आणली भगव्याची,
आणि मुहर्तमेढ रोवली
स्वराज्याची...
म्हणूनच म्हणतात,
"जय भवानी जय शिवाजी"
=========================================

एक सूर एक ध्यास
छेडितो मराठी..
एक संघ एक बंध
गुजीतो मराठी..
एक श्वेत अनेक रंग
... रंगतो मराठी..
एक बोध एक विचार
मांडतो मराठी..
एक साज एक आवाज
ऐकितो मराठी..एक एक मन एक एक क्षण
जगतो पुन्हा पुन्हा ती मराठी..
सांगतो मराठी.. वाहतो मराठी..
पूजितो मराठी.. साहतो मराठी..
हुंकारते मराठी.. गर्जते मराठी..

--भागवत रोडगे
---------------

              (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भागवत रोडगे.ब्लॉगस्पॉट.कॉम)
             -----------------------------------------------------


  -----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.02.2022-शनिवार.