II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II-चारोळी, कविता क्रमांक-7

Started by Atul Kaviraje, February 19, 2022, 07:43:28 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                               II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II
                                      चारोळी, कविता क्रमांक-7
                             -----------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१९.०२.२०२२-शनिवार, छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती आहे. "पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी इ. स. १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. ... महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार, १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख २००१ साली स्वीकारली." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींनी शिव-जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या सुमुहूर्तावर काही चारोळी व कविता.

न शिकवता शिकलो
शिवानितीचे धडे !
उच्चार जर कराल
शिवशब्दाचा तर मृत
हृदयही धडधडे !
अपमान जर कराल राजांचा
तर फाडून काढूखडे खडे !
शिवरायांच् या पुण्याईने
मराठी पाऊलपडते पुढे !
  =========================================

नका लाजवु पुन्हापुन्हा रे,
स्वभाव माझा असा जुना रे.....
मुजरा माझ्या राजास करा,
येईल जन्मा तोच पुन्हा रे.
.
.
.
.
ll जय शिवराय ll
ll जय शिवराय ll
=========================================

महाराष्ट्राच्या मातीमधुनी
आवाज उठतो मराठीचा
सह्याद्रीच्या रांगामधूनी सूर्य
उगवतो मराठीचा कीतीही
डोंगर पोखरले परक्यांनी तरीही
सह्याद्री सांधला हा बहुमान मराठीचा
कण्हत्या सह्याद्रीच्या
पोटामध्ये
घुमतो आवाज मराठीचा
एकतेची साद घेवुनी

संवाद मराठीचा
शब्द चिंगार
आवाज मराठीचा
संस्कार दिसे खुलुनी
साजशृंगार माय मराठीचा
हाती तेजोमय तलवार
तळपते
रणांगणात गर्जतो यलगार मराठीचा
गरजले परके सारे जरी
घरात आपापल्या
नभी उठतो बुलंद आवाज हा
ललकार मराठीचा
शिवबाची ज्योत ह्रदयी
ठेवतो तेवत, बाणा
मराठीचा
.
.
.
.
.
.
झेंडा स्वराज्याचा..
झेंडा शिवराज्याचा..
गर्जा महाराष्ट्र माझा
जय शिवराय !!!!!
=========================================

ना सत्तेसाठी, ना स्वार्थासा ठी....
जीव तळमळतो फक्त
मराठी उत्कर्षासाठी....
भल्याभल्यांना लोळवणारी
महाराष्ट्राची माती आहे...
खंजीरही घूसणार नाही
अशी मराठ्यांची छाती आहे.....
हा संदेश प्रत्येक मराठ्याला
जगायला आणि जगवायला...
अरे फक्त वाचता काय खरे
मराठी असाल तर forward करा....
========================================

माजली असतील कुत्री
पण
आम्हाला आडवी जात
नाही....
कारण
त्याना चांगल माहीत आहे
वाघ फाडल्या शिवाय
राहत नाही...
भुंकत असतील माघारी
आमच्या समोर
भुंकत नाही ....
त्याना हे पण
माहीत आहे
हा वाघ त्यांच्यावर
थुंकत नाही...
पिसाळले असले तरी आमच्या
गल्लीत फिरकत नाही....
बापान सांगुन ठेवल आहे त्यांच्या
मराठा फुशारकि
मिरवत नाही...
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शभुं राजे

--भागवत रोडगे
---------------

               (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भागवत रोडगे.ब्लॉगस्पॉट.कॉम)
              -----------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.02.2022-शनिवार.